Goa Pradesh Congress Committee Vice President Sunil Kavthankar Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: ''पाणीटंचाईने लोक त्रस्त, मुख्यमंत्री सावंत कर्नाटकात प्रचारात व्यस्त''; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Goa Chief Minister Pramod Sawant: राज्यातील जनता पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे त्रस्त असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेसने गुरुवारी केला.

Manish Jadhav

Congress Criticizes Goa Chief Minister Pramod Sawant: राज्यात सध्या मोठी तापमानवाढ पाहायला मिळत आहे. पारा 33 अंशांच्याही पार पोहोचल्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्याला पुन्हा मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील एकूण सात धरणांपैकी तीन धरणांतील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या खाली गेला आहे. पाण्याबाबत समस्या निर्माण होण्याची भीती सतावू लागली आहे.

दरम्यान, राज्यातील जनता पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे त्रस्त असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेसने गुरुवारी केला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपवर निशाणा साधला. कवठणकर म्हणाले की, 'मे महिन्यात पाण्याची पातळी कमी होईल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होईल.'

कवठणकर म्हणाले की, “गेल्या वर्षी पाण्याच्या टँकरसाठी लोकांनी दोन हजार रुपये मोजावे लागले. यंदा हा दर एक हजारांहून अधिक वाढू शकतो. टँकरचे पाणी विकत घेणे सर्वसामान्यांना कसे परवडणार? लोकांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून मुख्यमंत्री शेजारच्या राज्यात (कर्नाटक) प्रचारात व्यस्त आहेत.”

कवठणकर पुढे असेही म्हणाले की, ''भाजपची ‘हर घर जल’योजना सपशेल फेल ठरली आहे. मला वाटते की भविष्यात लोकांना त्यांच्या घरगुती आर्थिक व्यवस्थापनाच्या यादीत ‘पाणी टँकर’ खरेदीही लिहावी लागेल.”

राज्य सध्या मोठ्या पाणी टंचाईचा सामना करत असताना मुख्यमंत्री सावंत लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. ज्यांना भाजपकडून ‘लाभ’ होतो तेच सुखी आहेत. मात्र, राज्यातील सामान्य माणूस त्रस्त आहे. मुख्यमंत्री सावंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत,’’ असेही ते पुढे म्हणाले. “गेल्या दहा वर्षांपासून ते चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु डबल इंजिन असूनही ते आपला शब्द पाळण्यात अपयशी ठरले,” असेही कवठणकर पुढे म्हणाले.

उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढतो, हे माहीत असूनही हे सरकार या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. यावरुन मुख्यमंत्री गंभीर नसल्याचे सिद्ध होते. भाजपचे ‘नारी शक्ती’आश्वासन खोटे आहे, कारण ते महिलांना पाण्यासाठीही त्रास देत आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT