Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी
Sao Jose De Areal Panchayat Gramsabha
सासष्ठी: सां जुझे आरियल पंचायत क्षेत्रात कारखान्यांकडून प्रदूषण होत असल्याचे सरपंच कार्मिना फर्नांडिस यांनी मान्य केले. मात्र हे प्रदूषण नष्ट करण्यासाठी पंचायतीच्या प्रयत्नांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी लावला. प्रदूषणासंदर्भात आजच्या ग्रामसभेत दीर्घ चर्चा झाली. पंचायत अशा कारखान्यांविरोधात असताना काही पंच या कारखान्यांकडून देणगी मिळवतात हा मुद्दाही स्थानिकांनी उपस्थित केला.
पंचायतीने या कारखान्यांकडून कसलीही देणगी स्वीकारु नये, असा ठराव मंजुर करण्यात आला. सध्या पंचायत क्षेत्रात पंचायत स्वत: कचरा उचलते. यापुढे कचरा उचलण्यासाठी शुल्क आकारले जाईल, असे सरपंच कार्मिना फर्नांडिस यांनी सांगितले.
मोठे प्रकल्प नकोत
सां जुझे आरियल पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररित्या भूखंड केले जातात व तिथे बेकायदेशीर कामे सुरु आहेत. यासंदर्भात पंचायतीने कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. पंचायतीकडे योग्य साधन सुविधा नसल्याने मोठे प्रकल्पही नकोत, असे स्थानिकांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.