Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमागे राज्याबाहेरील लोकांचा हात

कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी विश्‍वाने डोके वर काढले आहे. विनयभंग, चोरी, गोळीबार, बलात्कार, खून आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट यासारख्या घटनांमुळे सामाजिक अंतरंगात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असून गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमधून राज्याबाहेर लोक सहभागी असल्याचे सांगितले आहे.

राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्यांनी जरी असं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही सध्या चांगलच गाजत असलेल्या सोनाली फोगट आणि अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींमध्ये गोव्यातील लोकच सहभागी असल्यानं मुख्यमंत्री केवळ बचावासाठी सावध प्रतिक्रिया देत असल्याचंही बोललं जात आहे.

राज्यात गुन्हेगारी फोफावली आहे. अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार, कुडचडेत वाळू माफियांमधील अंतर्गत वादातून कामगाराचा खून, चोऱ्या, सोमवारी तर बायणा वास्को येथे दिवसाढवळ्या चौघांनी तरुणाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणांमुळे सामाजिक क्षेत्रामधून चिंता व्यक्त होत आहे. तर विरोधकांनीही राज्य सरकारवर आगपाखड सुरू केली आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुन्हेगारीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षानेही सरकारच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हेगारी फोफावत असल्याची टीका केली. वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे राज्यातील जनता सुरक्षित नाही, असे सांगत गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी संताप व्यक्त केला. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT