Chief Minister Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

शिरोड्यात भाजपचे कमळ पुन्हा फुलण्यासाठी सज्ज: मुख्यमंत्री

आमदार शिरोडकर दहाव्यांदा विजयी होणार असल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

Shiroda Constituency: कोडार भागातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भाजपच्या पारड्यात सर्व मते पडून आमदार सुभाष शिरोडकर दहाव्यांदा विजयी होणार आहेत. हा उत्साह असाच कायम ठेवून भाजपचे कमळ शिरोड्यात (Shiroda Constituency) पुन्हा फुलण्यासाठी कार्यरत राहावे.

कोडारचे लोक प्रामाणिक व स्वाभिमानी असल्याने येथील जनता भाजपच्या बाजूने आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी व्यक्त केला. (People of Shiroda on the side of BJP Chief Minister said)

कोडार - बेतोडा भागात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत शिरोडा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार सुभाष शिरोडकर यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी बेतोडाचे सरपंच विशांत गावकर, माजी सरपंच व विद्यमान पंच सदस्य सुशांत गावकर, प्रसाद प्रभुगावकर, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक यांच्याबरोबर कोडार भागातील बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शिरोडकर म्हणाले, कोडार हा भाग नेहमीच मला पाठिंबा देत आला आहे. यापुढे ही सर्व नागरिक मला साथ करून विजयी करतील. शिरोड्यातील जनतेचा आशीर्वाद मिळाल्यानेच आपण सेवा करू शकलो, असेही शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

पहिल्यांदाच गाजवणार 'तेलगू' सिनेसृष्टी! अक्षय खन्ना साकारणार अजेय शुक्राचार्य; अंगावर शहारे आणणारा लूक Viral

ॲशेसवर कांगारुंची मोहोर! WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची बादशाहत कायम; इंग्लंडच्या पराभवाचा टीम इंडियाला फायदा की तोटा?

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT