Goa Fire Ponda Dainik Gomantak
गोवा

औद्योगिक आस्थापनं रहिवासी भागातून हटवण्याची फोंडेकरांची मागणी

सततच्या आगीच्या घटनांमुळे फोंडा परिसरातील नागरिकांची मागणी

दैनिक गोमन्तक

फोंडा : वाढलेल्या आगीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या फोंडेकरांनी आगीस कारण ठरणारी औद्योगिक आस्थापनं रहिवासी भागातून हलवण्याची मागणी केली आहे. कवळे भागातील आगीची घटना ताजी असतानाच आता ही मागणी जोर धरु लागली आहे. प्लास्टिक, स्क्रॅप आणि कच्च्या मालासह वस्तू तयार करणाऱ्या आस्थापनांना औद्योगिक वसाहतीत स्थानांतरित करण्याची मागणी फोंड्यातील नागरिकांनी केली आहे. (Ponda Fire News Updates)

औद्योगिक आस्थापनं रहिवासी भागांमध्ये असणं धोकादायक आहे. यामुळे मोठ्या दुर्घटना घडू शकतात आणि नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. प्लास्टिक किंवा स्क्रॅप रहिवासी इमारतीत साठवणे हे टाईमबॉम्ब लावल्यासारखं आहे, ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया फोंडा (Ponda) परिसरातील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी ग्रामसभा आयोजित करुन अशा आस्थापनांवर कडक कारवाई करण्याची आणि त्यांना रहिवासी भागांबाहेर स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे. कवळेतील अग्नितांडवानंतर भंगाराचा अड्ड्यावर कारवाईची मागणी होत होती, मात्र अजूनही हा मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे.

नुकत्याच डुमरे-कवळे परिसरात लागलेल्या आगीत (Fire) कोट्यवधींचं नुकसान झालं. या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर वस्तू भरुन ठेवलेल्या होत्या. हे गोदाम रहिवासी भागात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या आगीत गोदामातील प्लास्टिकच्या वस्तू, शेगड्या, घरगुती सामान आणि इतर माल जळून खाक झाला आहे. दुमजली इमारतीत मोठ्या प्रमाणात सामान साठवून ठेवलं गेलं होतं, जे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं. या आगीच्या दुर्घटनेतून दोन कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांमुळे मोठी हानी टाळण्यात यश आलं आहे.

या अग्नितांडवानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पेट्रोल पंपाशेजारी काही भंगाराचे अड्डे आहेत, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसंच या भंगार अड्ड्यामध्ये गैरप्रकारही चालत असल्याची शंका स्थानिकांनी उपस्थित केली आहे. कवळेतील आगीस कारणीभूत ठरलेलं प्लास्टिकचं सामान विनापरवानगी साठवण्यात आल्याची माहिती स्थानिक सरपंचाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT