People of Goa ready to expel BJP D. K. Shivkumar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्यातील जनता भाजपला हद्दपार करण्यासाठी तयार: डी. के. शिवकुमार

मुरगावात काँग्रेसला (Congress) वाढता प्रतिसाद असल्याने गोव्यात काँग्रेस बहुमताने विजयी होणार ; डी. के. शिवकुमार

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोव्यातील जनता भाजपला हद्दपार करण्यासाठी तयार झाली असल्याची प्रतिक्रिया कर्नाटक राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुरगावचे काँग्रेस उमेदवार तथा गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर बरोबर बायणा परिसरात घरोघरी प्रचारावेळी दिली. मुरगावात काँग्रेसला (Congress) वाढता प्रतिसाद असल्याने गोव्यात काँग्रेस बहुमताने विजयी होणार असल्याची माहिती डी. के. शिवकुमार यांनी दिली. (People of Goa ready to expel BJP D. K. Shivkumar)

मुरगावचे काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारात वेग घेतला आहे. शुक्रवार कर्नाटक राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर व इतर कार्यकर्त्यांसह या परिसरात घरोघरी प्रचार केला. यावेळी त्यांच्यासमवेत कर्नाटक राज्याच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य नीलम्मा सिद्दणा मेट्टी, मुरगावची नगरसेविका योगिता पार्सेकर, माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, समिर खान, सचिन भगत, सॅबी फर्नांडिस, माजी नगरसेवक सॅबी डिसोझा, व इतर कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डी के शिवकुमार म्हणाले की भाजपची संस्कृती म्हणजे भ्रष्टाचार, वासनाकांड यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना गोव्यातील जनता योग्य जागा दाखवतील अशी माहिती शिवकुमार यांनी दिली. परप्रांतीयांची घरे पाडून त्यांना बेघर करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करणे एकमेव उद्दिष्ट काँग्रेस कार्यकर्त्यांनी योजिले असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली.

संपूर्ण गोव्यात कॉंग्रेस पक्षाचे वारे वाहत असून येणाऱ्या 10 मार्च रोजी पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मुरगावचे काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर यांनी दिली. बायणा भागातील जनतेवर भाजप सरकारने सदैव अन्याय केला असून येथील गरीब जनतेला भ्रष्टाचारी भाजप (BJP) सरकारने बेघर केले होते. बायणातील अनेक बेघर नागरिकांना अजूनही राज्य सरकारतर्फे पुनर्वसन केले नसल्याने येथील जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली. कर्नाटक माजी जिल्हा पंचायत सदस्य नीलंम्मा मेट्टी यांनी सांगितले की भाजप सरकारने संपूर्ण जगाला महागाईच्या खाईत टाकले आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचा पराभव निश्चित असल्याची माहिती श्रीमती मेट्टी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT