Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : स्‍थानिकांना माहिती असते, पोलिसांना नसते, असं का?

ड्रग्स व्यवसायात सापडलेल्यांना कोणतीही सवलत न देता समूळ बिमोड करण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police : ड्रग्स हा गोव्याला पोखरणारा रोग असून त्याचा मुळापासून नायनाट करणे पोलिसांना सहज शक्य आहे. मात्र त्‍यांच्‍याकडून केवळ दिखाऊपणा केला जातो. ड्रग्सची पाळेमुळे खेड्या पाड्यात पोहोचली असून ती उखडून टाकणे आज गरजेचे बनले आहे. लहान लहान मुले आज ड्रग्सच्या आहारी जात आहेत.

ड्रग्स विकत घेणारे आणि विकणाऱ्यांची टोळी गावागावात कुठे सक्रिय असते याची माहिती सर्वसामान्य लोकांना असते, पण स्थानिक पोलिसांना कशी नसते? असा खोचक सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे. अशा प्रकारांमुळे ड्रग्सची विक्री करणाऱ्यांचे आयतेच फावते. आज ड्रग्स घेणे ही फॅशन झाली आहे. प्रत्येक आडोशाला टोळके असतेच. यावर पोलिसांची करडी नजर असणे आवश्यक आहे.

अन्‍यथा अगोदरच हाताबहेर गेलेली युवापिढी आणखी बरबाद होईल. ड्रग्सच्‍या आहारी गेलेला माणूस कित्‍येकदा माणुसकी विसरतो. खरं म्हणजे ड्रग्स व्यवसायात सापडलेल्यांना कोणतीही सवलत न देता समूळ बिमोड करण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

काही वर्षांपूर्वी अंमलीपदार्थांचा व्यवहार प्रामुख्याने किनारी भागांमध्ये दिसून येत होता. आता हे लोण राजधानी पणजीसह राज्यभर पसरलेले दिसतेय. सत्तरीसारख्या दुर्गम भागातील पेडलर पोलिसांच्या जाळ्यात सापडू लागल्याने या व्यवहाराची पाळेमुळे खोलवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत पोलिसांनी 62 गुन्हे दाखल करत सुमारे अडीच कोटींचे 98 किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. आता तरी अंमलीपदार्थविरोधी पथकासह नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोने अधिक सतर्क होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

SCROLL FOR NEXT