Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : राज्यातील विध्वंस पाहून लोक त्रस्त! ‘इंडिया’चा भाजपवर वार

Goa News : युरी आलेमाव म्हणाले, दोन्ही उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ. भाजपने आमच्याविरोधात अनावश्यक मुद्दे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

पणजी, महागाई, बेरोजगारी आणि राज्याच्या पर्यावरणाचा जो विध्वंस होत आहे, ते पाहून गोव्यातील जागृत नागरिक त्रस्त आहे.

याच समस्या भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यास आणि काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणतील, असा विश्वास ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी रविवारी व्यक्त केला. पक्षांतरविरोधी कायदा मजबूत करू,असेही सांगण्यात आले.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे अध्यक्ष अमित पालयेकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, शिवसेनेचे नेते सुभाष केरकर यांच्यासह उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप, दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार कार्लुस फेरेरा आणि आमदार एल्टन डिकोस्ता, अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर आदी उपस्थित होते.

युरी आलेमाव म्हणाले, दोन्ही उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ. भाजपने आमच्याविरोधात अनावश्यक मुद्दे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पराभवाची भीती वाटत असल्याने भाजपने असे डावपेच वापरले हे लोकांना कळाले आहे.

अमित पालेकर म्हणाले, आपणास विश्वास आहे की इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. हा लढा महागाई, पक्षांतराचे राजकारण आणि बेरोजगारीविरुद्ध आहे. मला विश्वास आहे की, ६७ टक्के विरोधी मतदार आमच्या उमेदवारांना मतदान करतील, असे ते म्हणाले.

दुर्गादास कामत म्हणाले, विरोधकांची एकजूट विजयात रुपांतरीत होईल. लोक महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहेत. मतदारांना इंडियाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करतो.

जुझे फिलिप म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून, गोव्याचे रक्षण करण्यासाठी जनतेने उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केले पाहिजे. हे डबल इंजिन सरकार दहा वर्षांपासून लोकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे.

लोकभावना भाजप विरोधात !

लोकांच्या भावना भाजपविरोधात आहेत. आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. म्हादई, डबल ट्रॅकिंग, कोळसा आणि इतर समस्या सोडवू. काँग्रेस पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत करेल.

केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर शंभर दिवसांच्या आत आम्ही महिला, तरुण, शेतकरी आणि इतरांना लाभदायक ठरणाऱ्या आमच्या ५ न्याय हमींची अंमलबजावणी करू, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

Pakistan: बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी! पाकिस्तानी कोस्ट गार्डच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला; 30 हून अधिक जवान ठार VIDEO

Morjim: ...अन् चिमुरड्याचा वाचला जीव! आमदार जीत आरोलकर यांची मदत ठरली वरदान

Goa Agriculture: पावसाच्या सरींनी फुलली शेतकऱ्यांची आशा; डिचोलीत शेतीकामे सुरू, कृषी खातंही सज्ज

SCROLL FOR NEXT