Goa News |Bus Service  Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Service: पेडणे केरी ते पणजी बस अनियमित; प्रवाशी त्रस्त

पेडणे केरी ते पणजी व्हाया शिवोली मार्गावरील कदंब वाहतूक महामंडळाची बस फेरी अनियमित असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

दैनिक गोमन्तक

पेडणे केरी ते पणजी व्हाया शिवोली मार्गावरील कदंब वाहतूक महामंडळाची बस फेरी अनियमित असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. (Irregular Kadamba Bus Service)

कदंबने आपले ब्रीद विसरू नये तसेच फायद्यातील मार्गाचे खाजगीकरण होऊ देऊ नये,अशी मागणी त्रस्त प्रवाशांकडून होत आहे.

दरम्यान, या बससेवेबाबत पणजी आगारात विचारणा केल्यास,पर्यायी बस नसल्याचे सांगितले जाते. वाहक,चालक नसल्याची सबब सांगून बऱ्याचदा प्रवाशांची बोळवण केली जाते,असे केरकर नामक प्रवाशाने सांगितले.

गेले कित्येक दिवस,या मार्गावर सकाळी 6.30 वाजता, केरी ते पणजी धावणारी कदंब बस अनियमित आहे.

या बसवर अवलंबून असलेले विद्यार्थी, सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी व बांबोळी इस्पितळात औषधोपचार व नियमित तपासणीसाठी जाणाऱ्या वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांची फरफट होत आहे.

पणजी आगारातील कर्मचाऱ्यांकडूनच प्रवाशांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कदंबची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. कदंब कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तरे येणार नाहीत, अशी दक्षता आमदार उल्हास तुयेकर यांनी घ्यावी,अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT