Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: पेडा - बाणावली खून प्रकरण; प्रियकर सूरज मायगेरीला 9 दिवसांची पोलिस कोठडी

Goa Murder Case: यापूर्वी विश्वनाथ यांच्या पत्नी वैभवी उर्फ मंगल सिधनलला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Pramod Yadav

Goa Murder Case

पेडा-बाणावली येथील विश्वनाथ सिधनल यांच्या खूनप्रकरणी सूरज मायगेरी (कडोळी, बेळगाव) याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी विश्वनाथ यांच्या पत्नी वैभवी उर्फ मंगल सिधनलला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने सहा महिन्यांपूर्वी पत्नी वैभवीने प्रियकर सूरजसोबत कट रचून रविवारी (दि.24) हा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

विश्वनाथ सिधनल खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असून विश्‍वनाथची पत्‍नी वैभवी हिचे आणखी एका युवकाशी सूत जमले होते. त्‍या संबंधात विश्‍वनाथचा अडथळा येत असल्‍यामुळे आपल्‍या प्रियकराच्याच मदतीने तिने विश्‍वनाथचा काटा काढला हे उघड झाले आहे.

दोघाही संशयितांचे शालेय जीवनापासून प्रेमप्रकरण होते. त्यांच्या संसारात ते खूश नव्हते. म्हणूनसाठी विश्वनाथचा काटा काढून एकत्र येण्याची आखणी त्यांनी सहा महिन्यांपासून सुरू केली होती. रविवारी त्यांनी डाव साधला.

अशी आहे पार्श्वभूमी

सूरज मायगेरी आणि वैभवी उर्फ मंगल सिधनल यांचे शाळेत असल्यापासून एकमेकांवर प्रेम होते. सूरज खालच्या जातीतला असल्याने वैभवीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला व तिचे विश्वनाथसोबत लग्न लावून दिले. सुरजचे देखील दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले.

दरम्यान, सूरज आणि वैभवी यांच्यातील लग्नानंतर देखील प्रेम फुलत गेले आणि ते पुन्हा संपर्कात आले. वैभवीचा पती प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी विश्वनाथचा खून केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT