pearls agrotech Investors meet Venzy viegas Dainik Gomantak
गोवा

पैसे न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; 'पर्ल्स अ‍ॅग्रोटेक'च्या गुंतवणूकदारांचा इशारा

बाणावलीचे आमदार व्हिएगस यांची घेतली भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Pearls Agrotech Investors MLA Venzi viegas : 'पर्ल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पाेरेशन लि'. या योजनेच्या घोटाळ्यात अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच भाजपकडून पैसे मिळवून देण्याचे मागील निवडणुकांमधील आश्वासन हवेत विरलेले आहे त्यामुळे आता हा विषय विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येईल असे आश्वासन बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दिले.

या घोटाळ्यात पैसे अडकून पडलेल्या एजंटसह गुंतवणूकदांनी व्हिएगस यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा ईशारा गुंतवणूकदारांसह एजंटांनी दिला.

पर्ल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पाेरेशन लि. या योजनेत राज्यातील 35 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूदारांनी गुंतवणूक केली होती. सर्वाेच्च न्यायालयात या घोटाळ्याप्रकरणी खटला चालू होता.

कंपनीच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात व त्या रक्कमेतून गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात यावेत. ही कारवाई सहा महिन्यात करण्यात यावी तसेच कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करावी असा निकाल 2016 मध्ये न्यायालयाकडून देण्यात आला होता.

निकाल लागून सात वर्षे उलटली मात्र अजूनही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत असे एका गुंतवणूकदाराने सांगितले. लोकसभा निवडणुकांपूर्वी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे न मिळाल्यास लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

विधानसभा अधिवेशनात हा विषय मांडण्यात येईल तसेच ‘सेबी’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करेन असे आश्वासन यावेळी आमदार व्हिएगस यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT