Panaji Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipal Corporation : ‘पे-पार्किंग’ला गदारोळातच मंजुरी! मोन्सेरात-फुर्तादोंमध्ये शाब्दिक द्वंद्व

महापौर रोहित मोन्सेरात यांनीही फुर्तादो यांच्या काळात १ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आपणही दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Municipal Corporation : पणजी, : राजधानी पणजीतील पे-पार्किंग निविदा प्रक्रिया विषयावर आयोजित केलेली महानगरपालिकेची विशेष सभा अवघ्‍या पंधरा मिनिटांत संपुष्टात आली. ही निविदा कायदेशीर असून, कंत्राट प्रक्रियाही कायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त क्लेन मेदेरा यांनी दिले.

परंतु माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी या कंत्राट प्रक्रियेला आक्षेप घेऊन दक्षता आयोगाकडे जाणार असल्याचे सांगितले.

त्‍यावर, महापौर रोहित मोन्सेरात यांनीही फुर्तादो यांच्या काळात १ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आपणही दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. दरम्‍यान, सत्ताधारी-विरोधकांच्या गोंधळातच कंत्राट प्रक्रियेला मंजुरी घेण्यात आली.

माजी महापौर आणि विद्यमान महापौर यांच्यात आता पे-पार्किंगच्या विषयावरून चांगलाच वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयुक्त क्लेन मेदेरा यांनी निविदा प्रक्रिया करताना कंत्राटदाराबरोबर केल्‍या गेलेल्या करारपत्राचे वाचन केले.

फुर्तादो यांनी या निविदा प्रक्रियेला आक्षेप घेतला. टोनी रॉड्रिगीस महापौर असताना झालेल्या पे-पार्किंग घोटाळ्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. जानेवारीत पे-पार्किंगच्या बैठकीत विषयपत्रिकेमध्‍ये कोणतीही नोट घातली नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, निविदा प्रक्रिया करताना ज्या काही अटी असतात, त्याबाबत माहिती देणेही महत्त्वाचे असते, असे नगरसेवक उदय मडकईकर यांनी सूचित केले.

सुरेंद्र फुर्तादोंच्‍या काळात मोठा घोटाळा : महापौर

पे-पार्किंगची निविदा ७५ लाखांना देण्याचे आम्ही निश्‍चित केले होते. तेव्हा सुरेंद्र फुर्तादो यांनी या प्रक्रियेत घोटाळा असल्याचा आरोप केला होता.

परंतु त्यांच्या काळात पे-पार्किंगसाठी ६० लाखांची निविदा काढली होती, मात्र केवळ ४० लाख रुपयेच जमा होत होते. त्यांच्या काळात प्रत्येक वर्षी निविदेतील रक्कम कमी होत गेली.

मार्केट सोपो, पे-पार्किंग आणि इतर फेरींच्या माध्यमातून केवळ ९० लाखांचा महसूल मनपाच्या तिजोरीत येत होता. या घोटाळ्याबाबत अंतर्गत अधिकाऱ्यांची नेमणूक करून दक्षता आयोगाकडे तक्रार करणार आहे.

शिवाय नगरविकासमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

म्‍हणून करारापूर्वीच पार्किंग शुल्क गोळा

आयुक्तांनी सांगितले की, गेल्‍या जानेवारीच्या बैठकीत तीन वर्षांसाठी पे-पार्किंग कंत्राटास मंजुरी दिली होती. ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२६ पर्यंत हे कंत्राट जुवारकर असोसिएटला दिले गेले आहे.

त्‍यासाठी दोन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. त्यातील २.१६ कोटींसाठी सोहम जुवारकर यांनी अधिक बोली लावली होती.

कंत्राटदाराने १.२६ कोटींची बँक ठेव व ४० लाखांची सुरक्षित ठेव जमा केली आहे. त्यामुळेच त्याने करार करण्यापूर्वी पार्किंग शुल्क गोळा केले. या स्पष्टीकरणाला फुर्तादो यांनी कडाडून विरोध दर्शविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT