pay and park  Dainik Gomantak
गोवा

Pay and Park: मार्केटात ‘पे-पार्किंग’द्वारे लूट! म्हापशात वाढत्या तक्रारी

कंत्राटदाराकडून दुप्पट शुल्क आकारणी

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: अनेक तक्रारी करुनही म्हापसा पालिका ही मार्केटमधील पे-पार्किंगच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याचे दिसते. पे-पार्किंग शुल्क निश्चित केले असतानाही, कंत्राटदार हा आजही परस्पर बाजारपेठेत पे-पार्किंग सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांकडून दुप्पट शुल्क आकारत आहे.

या मार्केटमधील एकंदर पे-पार्किंग धोरणामुळे तसेच पालिकेच्या संगनमतानेच वाहनचालकांची ही लूट होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. सद्यस्थितीत कंत्राटदार हा येणाऱ्या प्रत्येक दुचाकी चालकांस सरसकट दहा रुपयांची पावती देत असल्याने हा वादाचा मुद्दा बनला आहे.

म्हापसा पालिकेने बाजारपेठ आणि आसपासच्या परिसरात योग्य पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मार्केटमध्ये पे-पार्किंगचा निर्णय घेतला. त्यानुसार, दुचाकीला दोन तासांसाठी ५ रुपये निश्चित केले. त्यानुसार, दुचाकी पे-पार्किंग व चारचाकी पार्किंग रेखांकित करण्यात आली. मात्र, कालांतराने पालिका मंडळाच्या या ठरावाचे उल्लंघन होत असून, सध्या कंत्राटदार पे-पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकींसाठी थेट १० रुपये शुल्क आकारतोय. या माध्यमातून ग्राहकांना ५ रुपयांऐवजी १०रुपये मोजावे लागताहेत. अकारण, जादा शुल्क भरावे लागत असल्याने सध्या पार्किंग कर्मचार्‍यांशी लोकांचे वारंवार वाद होताहेत.

या संदर्भात गोवा कॅनने अलिकडेच म्हापसा पालिका मुख्याधिकार्‍यांना पत्र लिहून या समस्यांबाबत तक्रार केली होती. त्यानंतर, मुख्याधिकार्‍यांनी कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही पालिका मार्केटमध्ये अजुनही पार्किंगच्या नावाने सध्या कंत्राटदार जादा दर आकारत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT