Bus  Dainik Gomantak
गोवा

प्रवासी बसेस थेट महामार्गाने जात असल्याने सांताक्रुझमध्ये संताप

दुपारच्यावेळी गोमेकॉ इस्पितळातून सांताक्रुझ परिसरात जाणारे लोक व रुग्ण बसची वाट पाहत उभे असतात.

दैनिक गोमन्तक

पणजी : बांबोळी ते पणजी व्हाया सांताक्रुझ या भागातून वाहतूक करणाऱ्या प्रवासी मिनीबसेस दुपारच्यावेळी मार्ग बदलून बेकायदेशीरपणे राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने सांताक्रुझ परिसरात जाणाऱ्या प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. यासंदर्भातची माहिती वाहतूक खात्याला देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

सांताक्रुझ परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक नोकरीच्या निमित्ताने तसेच विद्यार्थी शाळेत जात असतात. काहीजण बांबोळी येथील गोमेकॉ उपचारासाठी जातात. राज्यात कोविडची साथ येण्यापूर्वी दर पंधरा मिनिटांनी मिनी बसेस धावत होत्या मात्र कोविडच्या साथी आल्यावर या बसेस काही काळ बंद झाल्या व त्यानंतर त्यांची संख्याही घटली. आता त्यातील अर्ध्याअधिक बसेस सुरू आहेत. या सर्वांना सांताक्रुझ भागातून वाहतूक करण्याचा मार्ग वाहतूक खात्याने दिला आहे. त्यामुळे त्यांनी या मार्गावरूनच जाणे सक्तीचे असताना अनेकदा मनमानी करत बांबोळी येथून त्या सरळ राष्ट्रीय महामार्गावरून पणजीला जातात. सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये घेतले जात नाही. गोमेकॉ इस्पितळातून दुपारच्यावेळी मोठ्या प्रमाणात थेट पणजीला जाणारे प्रवासी या मिनिबसेस चालकांना मिळत असल्याने नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

दुपारच्यावेळी गोमेकॉ इस्पितळातून सांताक्रुझ परिसरात जाणारे लोक व रुग्ण बसची वाट पाहत उभे असतात. कुजिरा येथील विद्यार्थीही बांबोळी गोमेकॉ इस्पितळपर्यंत चालत येतात व त्यानंतर या बसने सांताक्रुझ येथील घरी जाण्यासाठी बससाठी उभे असतात. परंतु मिनीबस उपलब्ध होत नसल्याने त्यांचेही हाल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT