goa minister vishwajit rane In Karnataka Election 2023 campaigning Dainik Gomantak
गोवा

Karnataka Election 2023 : मंत्री विश्‍वजीत राणे यांच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खूष!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तहान-भूक विसरून प्रचारकार्य

दैनिक गोमन्तक डिजिटल

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तेथेच मुक्काम ठोकून चालविलेले अत्यंत आक्रमक प्रचारकार्य पक्षश्रेष्ठींना पसंत पडले आहे. या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यास त्याची मोठी बिदागी त्यांच्या पदरी पडू शकते, असे राजकीय निरीक्षक मानू लागले आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्या सतत संपर्कात असल्याने राणे यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. गेले आठ दिवस दररोज अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करून विश्‍वजीत राणे यांनी विविध सभांना संबोधित केले आहे.

अंकोला येथे 3 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असून, 5 मे रोजी गृहमंत्री अमित शहा हल्याळ येथे सभा घेणार आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या सभांची जबाबदारी विश्‍वजीत राणे यांच्याकडे आहे.

हल्याळच्या सभेसाठी किमान 35 हजार लोक गोळा करण्याची महत्त्वाकांक्षा राणे यांनी बाळगली असून, ते तेथे तहानभूक विसरून काम करीत असल्याचा अहवाल दिल्लीला पोहोचला आहे.

दररोज ३०० किलोमीटर प्रवास

...तर राणेंचे वर्चस्व वाढणार

हल्याळ येथे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार केवळ 5 हजार मतांनी पराभूत झाला होता. सध्या कर्नाटकात जरी काँग्रेसच्या बाजूने वारे वाहत असले तरी या जिल्ह्यात भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करू शकले तर विश्‍वजीत यांचा राजकीय ग्राफ वाढणार आहे.

पाच आमदार दिमतीला

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील पाच आमदार राणे यांच्या दिमतीला कर्नाटकात पाठविले आहेत. जोशुआ डिसोझा, उल्हास तुयेकर, सुभाष फळदेसाई, दाजी साळकर आणि प्रमेंद्र शेट यांनी तेथे काम सुरू केले असून, ते सर्वजण राणे यांच्या सूचनेनुसार काम करत आहेत.

राणे स्वतः स्वस्थ बसत नाहीत, ते सतत फिरतीवर आहेत आणि तन-मन-धनाने कार्यरत आहेत. राणे यांच्या जाहीर सभांना मिळत असलेला प्रतिसादही दखलपात्र आहे. त्यामुळे त्यांचे नीतिधैर्य निश्‍चित उंचावलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT