Nandi Darshan cultural festival Dainik Gomantak
गोवा

Nandi Darshan: 'पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों'! पर्तगाळ येथे नांदी दर्शन; 575 कलाकारांनी उलगडला सांस्कृतिक ठेवा

Partgali Math Nandi Darshan: स्थानिक कलाकारांनी जय रामदेवा ही नांदी सादर करून नांदी कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर ‘पंच तुंड नररूंड मालधर पार्वतीश नमितो’ ही नांदी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: गोमंतकीय सारस्वत देवस्थान महाजनांकडून आज नांदी दर्शन कार्यक्रमाचा आविष्कार सादर करण्यात आला. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची दिव्य मालिका आयोजित करण्यात आली.

या पावन महोत्सवाचा एक विशेष सोहळा म्हणून जिवोत्तम मंडपात नांदी दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी सादर करण्यात आला. मठाधीश परमपूज्य श्रीमद्‍ विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज यांच्या प्रेरणा, कृपा आणि दूरदृष्टीतून आकारलेली ही अद्वितीय कलाकृती गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा सांस्कृतिक ठेवा नव्याने उजळून टाकणारा ठरला आहे.

स्थानिक कलाकारांनी जय रामदेवा ही नांदी सादर करून नांदी कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर ‘पंच तुंड नररूंड मालधर पार्वतीश नमितो’ ही नांदी झाली. श्री चामुंडा देवस्थानच्या भक्तांनी ‘जय जय तू चामुंडा देवी’, बांदिवडे - फोंडा येथील श्री महालक्ष्मी देवस्थानच्या कलाकारांनी ‘वंदन‌ करू जगदंबा चरणी’,

मडकई येथील श्री नवदुर्गा संस्थानच्या कलाकारांनी ‘वंदन करीत नत करीत दास’, सादोळशे येथील श्री मोहनी देवालय कलाकारांनी ‘वंदन तव पदी माय जननी गे’, पणजी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या कलाकारांनी ‘प्रार्थना महालक्ष्मी माते’ आदी नांद्या सादर केल्या.

१७ देवस्थानांतील नांद्या

प्राचीन नाट्यपरंपरेचा गौरवशाली अनुभव देत १७ देवस्थानांतील नांद्या तसेच सं. ‘शाकुंतल’ आणि सं. ‘मानापमान’ या संगीत नाटकांतील दोन नामांकीत नांद्या अशा एकूण १७ नांद्यांचा भव्य व पारंपरिक आविष्कार नांदी दर्शनामधून सादर करण्यात आला.

यामध्ये श्री चामुंडेश्वरी देवस्थान देऊळमळ केपे, श्री महालक्ष्मी देवस्थान बांदिवडे, श्री नवदुर्गा देवस्थान मडकई, श्री मोहिनी देवस्थान सदोळशे काणकोण, श्री महालक्ष्मी देवस्थान पणजी, श्री विमलेश्वर देवस्थान रिवण, श्री देवकीकृष्ण देवस्थान माशेल, श्री वेताळ देवस्थान फातर्पा, श्री नागेश महारुद्र देवस्थान नागेशी, श्री रामनाथ देवस्थान रामनाथी, श्री लक्ष्मी मंदिर ट्रस्ट सांवरकट्टा - कुंकळ्ळी, श्री दामोदर देवस्थान जांबावली, श्री अश्वथनारायण देवस्थान मोखर्ड - काणकोण, श्री महालसा नारायणी देवस्थान, म्हार्दोळ, श्री कामाक्षी देवस्थान, शिरोडा आदी देवस्थानांचा त्यात समावेश होता.

रसिकांवर आध्यात्मिक छाप

राज्यभरातून तब्बल पाचशे पंचाहत्तर कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संगीत, वेशभूषा आणि नाट्यशैली यांच्या शुद्ध, पारंपरिक आणि आध्यात्मिक अभिव्यक्तीतून त्यांनी रसिकांवर छाप सोडली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन योगीश सांबारी यांनी केले.

नांदी गायकांना वादनात ऑर्गनवर दत्तराज शेट्ये, तबला केदार धामस्कर, पखवाज यतीन तळावलीकर, तालवाद्य गोपाल प्रभू यांनी संगीत साथ दिली. रंगमंच व्यवस्था जितेंद्र बोरकर यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. भास्कर नायक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT