Ramayana Park Goa Dainik Gomantak
गोवा

Ramayana Park Goa: गोव्यात उभारतोय भव्य 'रामायण पार्क'! भाविकांसाठी ठरणार आकर्षण; पर्तगाळीत स्‍टेट ऑफ द आर्ट प्रकल्‍प

Partagali Gokarna Math: गोकर्ण जीवोत्तम मठाच्‍या स्‍थापनेच्‍या ५५० व्‍या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्‍या सार्थ पंचशताद्बी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने या मठ परिसराचा कायापालट करण्‍यास सुरुवात केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : पर्तगाळी येथील श्री गोकर्ण जीवोत्तम मठाच्‍या स्‍थापनेच्‍या ५५० व्‍या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्‍या सार्थ पंचशताद्बी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने या मठ परिसराचा कायापालट करण्‍यास सुरुवात केली आहे. या मठ संकुलाच्‍या प्राकारात उभे राहणारे ‘रामायण पार्क’ हा त्‍याचा केंद्रबिंदू ठरणार आहे. हा स्‍टेट ऑफ द आर्ट प्रकल्‍प भाविक आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरणार आहे.

भविष्‍यात ही मठवास्‍तू धार्मिक पर्यटनाचे गोव्‍यातील मुख्‍य केंद्र ठरण्‍याची शक्‍यता आहे. सध्‍या या आगळ्‍यावेगळ्‍या पार्कचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्‍प पूर्णावस्‍थेत येणार आहे. या पार्कचा आकार धनुष्‍याकृती असून याच पार्कमध्‍ये ७७ फूट उंचीचा श्रीरामाचा पुतळा उभा राहणार आहे. २० नोव्‍हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होण्‍याची शक्‍यता आहे.

सध्‍या पर्तगाळी येथील मठ संकुलात हजारो कामगार हा प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी दिवस रात्र झटत आहेत.या प्रकल्‍पाचे बांधकाम अभियंते अभय कुंकळयेकर यांच्‍या देखरेखीखाली चालू आहे. या प्रकल्‍पासंदर्भात माहिती देताना कुंकळयेकर म्‍हणाले, या संपूर्ण परिसरात हे पार्क अगदी आगळे वेगळे ठरणार असून या पार्कसाठी खास लँडस्‍केपींग केले जाणार आहे.

याच पार्कमध्‍ये ७७ फूट उंच श्रीरामाचा ब्राँझचा पुतळा उभा केला जात असून दिल्‍लीतील प्रसिद्ध कारागीर पद्मश्री राम सुतार यांच्‍याकडून हा पुतळा तयार केला जात आहे.

विविध प्रकल्प

‘गोमन्‍तक’च्‍या प्रतिनिधींनी या प्रकल्‍पाला भेट दिली असता, याच पार्कच्‍या बाजूला एक भव्‍य व्‍यासपीठ तयार होत असल्‍याचे दिसून आले. या व्‍यासपीठाचा वापर २७ नोव्‍हेंबरपासून सुरू होणाऱ्या सार्थ पंचशताद्बी महोत्‍सवादरम्‍यान होणाऱ्या सांस्‍कृतिक कार्यक्रमासाठी केला जाणार असून भविष्‍यात या व्‍यासपीठाचा वापर योगाभ्‍यास, धार्मिक सभा आदींसाठी केला जाईल असे कुंकळयेकर यांनी सांगितले.

याच परिसरात हेलिपॅड बांधण्‍याचेही काम युद्धपातळीवर चालू होते. २८ नोव्‍हेंबर रोजी या प्रकल्‍पाचे अनावरण करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पर्तगाळी येथे येणार असून त्‍यांचे हेलिकॉप्टर थेट या हेलिपॅडवर उतरणार आहे.

याच मठवास्‍तूत असलेल्‍या इंदिराकांत भवनाचाही जीर्णोद्धार केला असून या तीनमजली भवनात ५०० ते ६०० लोकांना बसून स्‍वामीजींचे प्रवचन ऐकण्‍याचे भाग्‍य लाभणार आहे.

तसेच सुमारे दोन हजार चौ. मी. जागेत एक बहुउद्देशीय सभागृह बांधले जात असून त्‍यात रामायणावर आधारित एक आगळेवेगळे संग्रहालय तसेच अद्ययावत असे ७ डी थिएटर उभे राहणार आहे. या थिएटरमध्‍ये श्रीराम संदर्भांतील वेगवेगळे चलचित्रे आणि माहितीपट दाखविण्‍यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT