Goa: राज्यपालांनी घेतले विद्याधिराज तीर्थ स्वामीजींच्या समाधीचे दर्शन

गोकर्ण पर्तगाळी मठात (Gokarn Partgali Math) स्वामी विद्याधिश (Swami vidhyadhish) यांच्याशी संवाद
Goa Swami Vidhyadhish
Goa Swami Vidhyadhish Dainink Gomantak

काणकोण : गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी आज गोकर्ण पर्तगाळी मठाचे (Gokarn Partgali Math) २३ वे स्वामी श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामीजींच्या (Shrimad Vidyadhiraj tirth Swamiji) समाधीचे दर्शन घेऊन शिष्य स्वामी विद्याधिश (Swami Vidyadhish) यांच्याशी संवाद साधताना दुःख व्यक्त केले. स्वामीजींनी धार्मिक कार्य करतानाच समाजोद्धाराचे कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील (Educational Work) त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. केरळ (Kerla) व गोवा (Goa) यांचे नाते पूर्वापार आहे. केरळमध्ये जसे धार्मिक आघात झाले, त्याचप्रमाणे गोव्यामधील जनतेवरही आघात झाले. मात्र, येथील समाजधुरिणांनी आघात झेलूनही गोवा एकसंघ ठेवला. त्या सर्व समाजधुरिणांना सलाम करायलाच हवा.

Goa Swami Vidhyadhish
Goa: अभिजात पर्रीकर यांच्या गाडीला अपघात

यावेळी स्वामी विद्याधिश (Swami Vidyadhish) यांनी तुम्ही २२ वे राज्यपाल (Goa Governer) म्हणून राज्याची धुरा सांभाळत आहात. मी मठाचा २४ वा उत्तराधिकारी आहे. त्यामुळे तुमच्या व माझ्या जबाबदारीत साम्य आहे. ही जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. (Shridharan Pillai) अनिल पै (Anil pai) यांनी राज्यपालांना मठाचा इतिहास सांगितला. (Gokarn Partgali Math)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com