Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी तुम्ही जर परशुराम घाटातून जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आताच तुमचा प्लॅन रद्द करा किंवा बदला.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट (Parshuram Ghat) वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून आल्यास तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती रस्त्यावर आली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
दरम्यान घाट केव्हापर्यंत बंद ठेवायचा ते अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. तसेच, लांब पल्ल्याची अनेक वाहने अडकून पडली आहेत.
तुम्ही देखील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा रद्द करा किंवा बदलला नाहीतर तुम्हाला देखील वाहतूक कोंडीसह बराचवेळी ताटकळत थांबावे लागू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.