पणजी - सेवेत कायम करावे या मागणीसाठी पॅरा शिक्षक (Parra teachers) आज विधासभेवर (assembly) मोर्चा घेऊन गेले. गेली 16 वर्षे पॅरा शिक्षक म्हणून विविध सरकारी शाळांमध्ये (Government schools) शिकवणाऱ्या 129 शिक्षकांनी आपणास सरकारी सेवेत कायम करावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरु केले आहे. विशेष म्हणजे या शिक्षकांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. (Parra teachers trying to take morcha vidhan bhavan from Azad Maidan in goa)
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना भेटण्यासाठी पॅरा शिक्षकांनी गेले दोन दिवस भाजप मुख्यालयाकडे जाऊन त्यांची वाट पाहिली. पण तानावडे या शिक्षकांना भेटलेच नाहीत.
म्हणूनच आज या शिक्षकांनी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पॅरा शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष स्मिता देसाई यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.