Goa Kushavati River Flood Dainik Gomantak
गोवा

Kushavati River: आठवड्यात दुसऱ्यांदा पूर; प्रवाशांचे अतोनात हाल

Goa Rain Update: पारोडा आणि अवेडे या दोन गावांना जोडणारा पूल पूर्णत: पाण्‍याखाली गेला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

केपेच्‍या कुशावती नदीला पुन्‍हा पूर आल्‍याने पारोडाचा भाग कालपासून पूर्णत: पाण्‍याखाली गेल्‍याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. याच आठवड्यात पारोडावासियांवर दोनवेळा ही वेळ आली आहे.

कालपासून पाऊस न थांबता पडत असल्‍यामुळे कुशावती नदीची पाण्‍याची पातळी वाढली असून रस्त्यावर पाणी आले आहे. तसेच परिसरातील गेले का दिवस शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे ती खराब होण्याचा धोका आहे. पारोडा आणि अवेडे या दोन गावांना जोडणारा पूल पूर्णत: पाण्‍याखाली गेला असून त्‍यामुळे संपूर्ण या भागाला नदीचे स्वरूप आले आहे.

या भागात वाहणाऱ्या पाण्‍याचा प्रवाह प्रचंड असल्‍याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पाणी काराळी गावापर्यंत पोहोचल्‍याने कालपासून या भागांचा बाकीच्‍या भागांशी संपर्क तुटला आहे. मडगावहून कुडचडेला जी वाहतूक होते, ती पारोड्याचा रस्‍ता पाण्‍याखाली गेल्‍याने विस्‍कळीत झाली असून ही वाहतूक आता चांदरमार्गे वळविण्‍यात आली आहे. यामुळेही या भागातील वाहतुकीवर परिणाम झाल्‍याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.

दत्तमंदिरापर्यंत पाणी!

केपे येथे दत्तमंदिराजवळ असलेल्‍या कुशावतीच्‍या पात्रातील पाणी वाढल्‍याने नदीचे पाणी आणखी पाऊस पडल्‍यास मंदिरापर्यंत पोहोचण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. त्यामुळे भाविकांना या मंदिरात जाणे कठीण झाले आहे. आणखी पाऊस पडल्यास हा रस्ताही पूर्णपणे बंद होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

SCROLL FOR NEXT