Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगाव येथील पार्किंगची जागा 'रेंट अ बाईक' वाल्याकडून हडप, नगरसेवकाचा आरोप

खाजगी दुचाकीही या 'रेंट ए बाइक' वाल्यानी रेंटसाठी वापरल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News मडगाव नगरपालिका परिसरातील सर्व ठिकाणच्या पार्किंग जागा 'रेंट अ बाईक'वाल्यानी हडप केल्या आहेत, त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्यांना आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे या 'रेंट ए बाईक' वाल्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली आहे .

विशेष म्हणजे खाजगी दुचाकीही या 'रेंट ए बाइक' वाल्यानी रेंटसाठी वापरल्या आहेत त्यांचेही पार्किंग या परिसरात करण्यात येत असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. या ठिकाणी रात्रीच्या वेळी आपल्या रेंट बाईक पार्क करून जागा अडवून ठेवत आहेत हे पाहण्यासाठी आपण रात्री 10.30 ला आलो होतो.

यावेळी नगरपालिका पार्किंग परिसर , नी मार्केट पार्किंग परिसर अशा सर्वच ठिकाणी आपल्या दुचाकी पार्क करून ठेवल्या होत्या. सकाळी या दुचाकी भाड्याला गेल्या तर गेल्या नाहीतर सकाळपर्यँत याच ठिकाणी पडून राहत असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

त्यामुळे मडगाव बाजारात बाजार करण्यासाठी दाखल होणाऱ्यांना आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही व येथील दुकादारावरही याचा परिणाम होत आहे . हा प्रश्न निकालात काढण्यासाठी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांना विनवणी करून हा विषय त्यांच्या कानावरही घातला आहे असे ते म्हणाले .

कधी कधी हे रेंट बाईकवाले येथील भाडे मारणाऱ्या मोटरसायकल पायलटवाल्यांची जागा हडप करून आपल्या दुचाकी पार्क करीत आहेत आणि विचारल्यास त्यांच्याकडे दादागिरीची भाषा बोलत असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करवी अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT