Fighting FreePik
गोवा

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Goa Crime News: वाळपई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयित योगेश राणे याला अटक करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: पर्ये सत्तरी येथील मॅनेजमेंट कॉलेजजवळील ग्रीन व्हॅली रेस्टॉरंटजवळ पार्किंगच्या किरकोळ वादातून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. यावेळी धारदार शस्त्राने एका युवकावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.

देऊळवाडा-कारापूर येथील योगेश सुभाष राणे (वय २७ वर्षे) याने हाऊसिंग बोर्ड, साखळी येथील अनिकेत सिंगबाळ (वय २७ वर्षे) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

प्राथमिक माहितीनुसार, पार्किंगच्या जागेवरून वाद सुरू झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. जखमी अनिकेतला तातडीने साखळी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेले. नंतर पुढील उपचारासाठी त्याला गोमेकॉत हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

वाळपई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयित योगेश राणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय प्रथमेश गावस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT