Papaya Cultivation Goa Dainik Gomantak
गोवा

Papaya Cultivation Goa: पपई उत्पादनात राज्यात फोंडा तालुका अग्रेसर! कृषी अहवालातून खुलासा, 155 हेक्टर क्षेत्रात 2583 टन उत्पादन

Papaya Farming In Goa: राज्यात काजू, आंबा, केळी आदी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु काही भागात पपईचेही उत्पादन केले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात काजू, आंबा, केळी आदी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु काही भागात पपईचेही उत्पादन केले जाते. राज्यात सर्वाधिक पपईचे उत्पादन फोंडा तालुक्यात घेण्यात येते, असे कृषी संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे.

इतर पिकांच्या तुलनेत राज्‍यात पपईची लागवड कमी प्रमाणात केली जाते. परंतु सद्यःस्थितीत मागणी वाढत असल्याने अनेक शेतकरी (Farmer) पपईच्या लागवडीकडे वळत आहेत. राज्यात सर्वसामान्यपणे ३३५ हेक्टर क्षेत्रफळात पपईची लागवड करण्यात येते, तर सुमारे ५४६२ टन इतके उत्पादन घेण्यात येते. पैकी १५५ हेक्टर क्षेत्रफळ फोंड्यात असून तब्बल २५८३ टन पपई उत्पादन तेथे घेण्यात येते, जे इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. उत्तर गोव्यात ५३ हेक्टर क्षेत्रफळात ८६२ टन तर दक्षिण गोव्यात २८२ हेक्टर क्षेत्रफळात ४६०० टन हे उत्पादन घेण्यात येते.

‘फायबर’मुळे मोठी मागणी

पपईत (Papaya) मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने तिचे सेवन केले जाते. बाजारात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खास करून स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेल्‍या पपईला प्राधान्‍य दिले जाते. तिला दरही चांगला मिळतो. परंतु राज्यात पपईला जेवढी मागणी आहे, तेवढे उत्पादन होत नसल्याने इतर राज्यांतून पपई मोठ्या प्रमाणात आयात केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

SCROLL FOR NEXT