Vasco To Panaji Jetty  Dainik Gomantak
गोवा

वास्को ते पणजी जेट्टीवरून संभ्रम ; खासदार, पंतप्रधान शुभेच्छा देऊन झाले मोकळे

खासदार श्रीपाद नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कौतुक केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

"पणजी ते वास्को अंतर 32 किमी आहे, हे अंतर पूर्ण करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ लागत होता. हाच प्रवास आता 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. कारण, अंतर 9 किलोमीटरने कमी झाले आहे. NW-68 यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे." असे ट्विट खासदार श्रीपाद नाईक यांनी ट्विट केले आहे. याचाच संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी देखील शुभेच्छ दिल्या आहेत. दरम्यान, पणजी ते वास्को जेट्टीवरून आता संभ्रम निर्माण झाला आहे.

(Panjim to Vasco distance reduced by 9 Kms journey can now be completed in just 20 minutes )

"पीएम गति शक्ती योजने सारख्या धोरण, हेतू आणि तंत्रज्ञान आणि तरंगत्या जेटीसारखे तंत्रज्ञानामुळे गोव्यातील तरंगत्या जेटीसारख्या यशोगाथा निर्माण होतात. मांडवी नदी ही गोव्याची जीवनदायी आहे."

"किनारी प्रदेश असल्याने, CRZ मंजुरी आणि पर्यावरण मंजुरी अशा गोष्टी जेट्टी बांधण्यासाठी अडसर ठरत होत्या. दरम्यान, यांच्या पीएम गति शक्ती योजनेअंतर्गत जेट्टीचे धोरण शक्य झाले आहे." असे ट्विट गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी केले आहे.

"पारंपारिक जेटींपेक्षा फ्लोटिंग जेटी केवळ स्वस्तच नाहीत तर त्यांचे आयुष्य देखील 50 वर्षांपेक्षा अधिक आहे. यामुळे जनतेच्या पैशाची बचत शक्य झाले आहे. तरंगती जेटी असल्याने सीआरझेड आणि पर्यावरण मंजुरीपासून मुक्ती मिळणे शक्य झाले. गोव्यातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे तरंगती जेटी मिळाली आहे." असेही नाईक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या जेट्टीबाबत मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. जेट्टी अद्याप सुरूच झाली नसून, खासदारांनी ट्विट कोणत्या आधारावर केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खासदार श्रीपाद नाईक यांच्या ट्विटचा संदर्भ देत शुभेच्छा दिल्या आहेत. "पणजी ते वास्को दरम्यानच्या या कनेक्टिव्हिटीमुळे लोकांना दिलासा मिळण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे." असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

SCROLL FOR NEXT