Panjim Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

CCP Meeting: मडकईकर-फुर्तादो आक्रमक; ‘स्मार्ट सिटी’वरून महापालिका सभेत गोंधळ

कंत्राटदारांना बैठकीत बोलावून जाब विचारावा; सभेत मागणी

दैनिक गोमन्तक

CCP Meeting: शहरातील स्मार्ट सिटीच्या भिजत घोंगड्याचे पडसाद महापालिकेच्या आजच्या बैठकीत उमटले. नगरसेवक उदय मडकईकर आणि सुरेंद्र फुर्तादो यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढले. स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करावे, तसेच कंत्राटदारांना बैठकीत बोलावून जाब विचारावा, अशी मागणी त्यांनी केली.

शहरात नोव्हेंबरपासून पुन्हा खोदाई सुरू होणार असून लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याचे पडसाद आज बैठकीत उमटले.

महापालिकेच्या सभागृहात सकाळी महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याप्रसंगी आयुक्त क्लेन मेदेरा, उपमहापौर संजीव नाईक यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

मडकईकर म्हणाले की, नगरसेवकांना आपल्या प्रभागात कोणती कामे चालली आहेत, हेच समजत नाही. स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करायला हवे, त्याचबरोबर जे कंत्राटदार स्मार्ट सिटीची कामे करतात, त्यांना बोलावून जाब विचारायला हवा. स्मार्ट सिटीच्या कामांविषयी विशेष बैठक बोलवावी, अशी यापूर्वी मागणी केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

विषय न मांडताच निविदा

पे-पार्किंगचे कंत्राट निविदा काढण्याबाबतचा विषय नगरसेवकांच्या बैठकीत मांडला नाही. नगरसेवकांच्या बैठकीत या विषयाला मंजुरी घेतली नाही, तरीही निविदा प्रक्रिया कशी केली, असा सवाल मडकईकर यांनी उपस्थित केला.

अष्टमीच्या फेरीतील स्टॉलच्या भाड्याचा विषयसुद्धा नगरसेवकांच्या बैठकीत मंजुरीसाठी घेतला गेला नाही, असे सांगत मार्केटमधील सोपो गोळा करण्याविषयी निविदा प्रक्रियेवर सुरेंद्र फुर्तादो यांनी आक्षेप नोंदविला.

नगरसेवकांना ठेवले अंधारात

मडकईकर म्हणाले की, या कामासाठी रस्ते खोदले; पण ते व्यवस्थित बुजवलेले नाहीत. भाटले येथील रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. स्मार्ट सिटीचे काम घेतलेले कंत्राटदार मग्रुरीने वावरत असून स्मार्ट सिटीची कामे करताना नगरसेवकांना अजिबात विश्‍वासात घेतले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT