Crime Case  Dainik Gomantak
गोवा

Panjim विद्यार्थिनी बलात्कार प्रकरण! चालकाच्या 'त्या' बसची सुटका करण्यास न्यायालयाचा नकार

चालकाने बस सोडण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. त्याला न्यायालयाने नकार दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

नाताळ पार्टीनिमित्त पणजीत आलेल्या वास्कोतील एका अभियंता विद्यार्थिनीवर मिनी बस चालकाने ती बसमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना नाताळच्या दिवशी (रविवारी, दि.25) संध्याकाळी पाटो - पणजी (Patto Panjim) येथे पार्क केलेल्या मिनीबसमध्ये घडली. 

बस चालक चंद्रशेखर वासू लमाणी (35) याला रात्रीच अटक केली, तसेच पोलिसांनी चालकाची बस देखील जप्त केली. दरम्यान, चालकाने बस सोडण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. त्याला न्यायालयाने नकार दिला आहे.

चंद्रशेखर लमाणी याने पणजी न्यायालयात (Panaji Court) बसची सुटका करावी अशी मागणी करणारा अर्ज केला होता. बस हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग असल्याचे त्याने म्हटले होते. पण, न्यायालयाने बस सोडण्यास नकार दिला आहे. बसमध्येच ही घटना घडली होती आणि अजून तपास बाकी असल्याने ती सोडता येणार नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

25 डिसेंबर 2023 रोजी नाताळ निमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनींचा एक गट वास्को येथून पणजीत नाताळ सण साजरा करण्यासाठी आला होता. या गटाने भाडेपट्टीवर मिनी बस (जीए 06 टी 5376) ठरविली होती. पणजीत ही मिनी बस पार्क होम हॉटेलजवळ उभी करण्यात आली होती. मिनी बसमधून सर्वजण उतरून पार्टी करण्यासाठी गेले. गटासोबत ही पीडित विद्यार्थिनीही होती. पार्टीमध्ये बहुतेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मद्यप्राशन केले.

पीडित विद्यार्थिनीला केलेल्या मद्य प्राशन केल्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने ती आराम करण्यासाठी दुपारच्यावेळी पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या मिनीबसमध्ये आली. बाकीचा गट हे पार्टीमध्‍ये होते. गाडीमध्ये तिच्याशिवाय कोणीही नव्हते.

दरम्यान, बस चालकाने गैरफायदा घेत विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भात कोणाला सांगशील तर तुझीच बदनामी होईल अशी धमकी दिली व तेथून तो निघून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दोन खुनांनी हादरला बार्देश, कळंगुट, बोडगिणीतील घटना; मित्राच्या पत्नीचा फोटो पाहण्याचा हट्ट भोवला

Horoscope: कामदा एकादशीला विष्णूंची कृपा; 'या' चार राशींचे भाग्य उजळणार, सुख-समृद्धीचा योग!

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

SCROLL FOR NEXT