Panjim police, within 12 hours, arrested security guard Assam for trespassing Dainik Gomantak
गोवा

सुरक्षा रक्षकाकडून लूट, 12 तासात आरोपीला बेड्या

चोरीच्या वस्तू जप्त, आरोपीला अटक

दैनिक गोमन्तक

पणजी पोलिसांनी 12 तासांच्या आत सुरक्षा रक्षक रंजन तैद (30) याला आसाममधील हेरडटीव्ही कार्यालयात घुसून 2 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याबद्दल अटक केली आहे. त्याच्या जवळचा सर्व माल जप्त करण्यात आला आहे, पुढील तपास पणजी पोलिस (Police) करत आहेत. आरोपीची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, मायणा कुडतरी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 15 वर्षीय मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सासष्टी (Salcete) तालुक्यातील मायणा कुडतरी भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. 22 वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती असून पोलिसांनी तरुणाला लागलीच अटकही केली आहे. अल्पवयीन मुलगी ही आरोपीच्या घरी पाणी भरण्यासाठी गेली होती. याचवेळी कुणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार (Rape) केला. यानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT