Members of Raziya gang arrested Dainik gomantak
गोवा

Panaji News: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Raziya Gang's 2 Members Caught By Goa Police: मिरामार येथील निष्ठा तिवारी यांच्या फ्लॅटमध्ये दोन दिवसांपूर्वी दुपारच्यावेळी संशयितांनी दाराचे कुलूप तोडून चोरी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मिरामार व वेर्णा येथील घरफोड्याप्रकरणी देशात २५ गुन्हे नोंद असलेल्या अरमान शोकिन खान (३३) याच्यासह पवन नरसिंग गौड (२२) या दोघांना गोव्यातील एका हॉटेलातून अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने अटक केली.

या दोघांकडून चोरीला गेलेले ३.७५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दोघांचीही पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

या संशयितांचा आंतरराज्य टोळीशी संपर्क असून ही टोळी रझिया गँग म्हणून ओळखली जाते, अशी माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

मिरामार येथील निष्ठा तिवारी यांच्या फ्लॅटमध्ये दोन दिवसांपूर्वी दुपारच्यावेळी संशयितांनी दाराचे कुलूप तोडून चोरी केली होती. त्याची तक्रार पणजी पोलिसांत देण्यात आली होती.

चोरट्यांनी यावेळी बॅगेतील किंमती मनगटी घड्याळ, चांदीचा एक चमचा व दोन बाऊल, चांदीचे दोन कर्णफुले, ओम डिझाईनचे एक सोन्याचे पेंडंट मिळून सुमारे ३५ हजाराचा ऐवज लंपास केला होता.

याप्रकरणी पणजी पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेतला. त्यासाठी त्या परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेराची मदत घेण्यात आली. या गुन्ह्याबाबत काहीच धागेदोरे नव्हते.

पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार हे चोरटे वेर्णा येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पणजी पोलिस पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी त्यांची झडती घेतली असता व चौकशीत त्यांनी मिरामार व वेर्णा येथील फ्लॅटमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

संशयित अरमान याने या फ्लॅटमधून सुमारे ३ लाखांचा ऐवज चोरला होता. त्या दोघांकडून पणजी व वेर्णा येथील चोरीवेळी चोरलेला पूर्ण माल जप्त करण्यात आल्याचे कौशल यांनी सांगितले. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ व ३०५ खाली संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संशयित अरमान शोकिन खान हा दिल्ली पोलिसांना त्यांच्या तेथील चोरीच्या गुन्ह्यामध्ये हवा आहे. विविध राज्यामध्ये तो २५ हून अधिक चोरीच्या गुन्ह्यामध्ये सामील आहे. त्याने चौकशीत त्यांची आंतरराज्य टोळी असून रझिया गँग या नावाने गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

SCROLL FOR NEXT