CCP Meeting On Pay Parking Tendering Process Dainik Gomantak
गोवा

CCP Meeting: पे-पार्किंगच्या मुद्द्यावर महापालिकेत विशेष बैठक; कंत्राट प्रक्रियेला मान्यता

माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांचे आरोप महापौर मोन्सेरात यांनी फेटाळले

Rajat Sawant

CCP Meeting On Pay Parking Tendering Process: राजधानीतील पे-पार्किंगच्या मुद्यावरून सोमवारी पालिकेत विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पे पार्किंग कंत्राटाच्या प्रक्रियेला महानगरपालिकेने अखेर मान्यता दिली. विशेष बैठकीमध्ये हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. 

मागील बैठकीत पे पार्किंगच्या कंत्राटाची मुदत संपूनही संबंधित कंपनी पार्किंग शुल्क आकारत आहे, ती गोळा होणारी रक्कम कोणाच्या खिशात जात आहे असा सवाल माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी उपस्थित केला होता.

नगरसेवक उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो आणि ज्योएल आंद्रदे यांनी पे पार्किंग कंत्राटाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मात्र, महापौर रोहीत मोन्सेरात यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

आज झालेल्या बैठकीत प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कंत्राटदाराची मुदत संपली होती. त्या कंत्राटदाराला २७ जानेवारी रोजी महापालिकेच्या बैठकीत सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आली.

यानंतर जुलै मध्ये निविदा काढण्यात आली. सोहम जुवारकर त्यांनी सर्वाधिक २.१ कोटीची बोली लावली. त्यांनी सुरक्षारक्कम म्हणून सुमारे १ कोटी ६० लाख रुपये महापालिकेकडे जमा केले आहेत.

नवीन कंत्राट १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाले अशी माहिती आयुक्त क्लेन मदेरा यांनी यावेळी दिली.

दरम्यान, फुर्तादो कंत्राटाचा मसुदा दाखवला नसल्याचा आरोप करत आहेत. मात्र, ते महापौर असताना जे कंत्राट होते तेच आता लागू करण्यात आले असून यामध्ये दोन गोष्टी नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. निविदेची रक्कम त्यांच्या काळातील निविदे पेक्षा खूप जास्त आहे असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT