Bicholim Market: डिचोली बाजारातील अतिक्रमणे हटविली; पालिकेची कारवाई

जुन्या मार्केटमधील गल्लीत भीषण आग लागल्याची घटना घडली होती.
Bicholim Market
Bicholim MarketDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोलीतील जुन्या मार्केटमधील आतील गल्लीत गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीच्या आपत्तीमुळे दुकानदारांच्या झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात गेला आहे. तीन दुकानांना आगीच्या ज्वाळांनी घेरले तर लगतच्या 3-4 दुकानांना आगीची झळ पोहचली आहे.

दरम्यान या आगीच्या घटनेवेळी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी नेण्यास अडथळा निर्माण झाला होता. मार्केटमधील अतिक्रमणांमुळे तसेच इतर अडथळ्यांमुळे बंब बाजारात नेणे शक्य झाले नाही. याची पालिकेने गंभीर दखल घेतली.

Bicholim Market
Kadamba Bus-Car Accident: सत्तरीत कदंब स्कूलबस अन् कारचा अपघात! सुदैवाने जीवितहानी नाही

आगीची घटना घडल्यानंतर पालिकेला आता खडबडून जाग आली. काही दिवसांपूर्वी पालिकेने मार्केटमधील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पालिकेतर्फे मार्केटमधील दुकानदारांना अतिक्रमणे काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही दुकानदारांनी अतिक्रमणे हटविली. मात्र काही हटविण्यात न आल्याने पालिकेने सोमवारी सकाळी मोहीम राबवित पालिकेच्या कामगारांनी अतिक्रमणे काढली.

या कारवाईवेळी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आपत्तीच्या वेळी मदतकार्य करण्यास अडथळा येवू नये यासाठी ही कारवाई केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान आगीसारख्या घटनेवेळी आपत्कालीन मदतकार्य म्हणून येथील बाजारात नव्याने ''फायर हायड्रण्ट''ची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘फायर हायड्रण्ट'संबंधी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी पालिकेला सूचना केली आहे. लवकरच पालिका मंडळाची बैठक घेऊन तसा ठराव घेण्यात येईल.

Bicholim Market
Ironman: धक्कादायक! गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेदरम्यान कोसळलेल्या 'त्या' स्पर्धकाचा मृत्यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com