Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

हम नशे में है! पणजीत मद्यधुंद टोळक्याकडून एकास मारहाण; तिघांना अटक, पाचजण फरार

Goa Crime News: मद्यधुंद असलेल्या आठजणांनी खांडेपारकर याला बेदम मारहाण केल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News

पणजी: पणजीतील एका मद्यालय क्लबच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना क्षुल्लक कारणावरून फोंडा येथील शार्दुल खांडेपारकर याला काहीजणांनी मद्याच्या नशेत मारहाण केली.

मद्यधुंद असलेल्या आठजणांनी खांडेपारकर याला बेदम मारहाण केल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, तर इतर पाचजण फरारी आहेत, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.

पणजी पोलिसांनी संशयित विराज गडकरी, झिया मन्सूर, फ्रांसिस फर्नांडिस, सॅमी शेख, प्रबिन फर्नांडिस, प्रिन्स फर्नांडिस, नानू बेग व आदित्य नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील तिघांना अटक केली आहे.

तक्रारदार शार्दुल खांडेपारकर हा पणजीतील क्लब सोहो मधून खाली उतरत असताना त्याचवेळी संशयितांचा गटही बाहेर पडत होता. त्यावेळी काही क्षुल्लक कारणावरून तक्रारदार व या गटाबरोबर बाचाबाची झाली. या गटाने अडविले व त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

संशयितांनी तक्रारदाराच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर ठोसे लगावून जखमी केले. संशयितांनी त्याची मान पकडून दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या नाकालाही गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी तक्रारदार खांडेपारकर याने पणजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली व इतर पाचजणांचा शोध घेत आहेत.

तक्रारदार व संशयित हे एकमेकाला ओळखत नाहीत. त्यांची मद्यालयात अगोदर बाचाबाची झाली होती व त्यानंतर मद्यालयातून बाहेर पडताना पुन्हा बाचाबाची होऊन हा मारहाणीचा प्रकार घडला अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: ‘आमठाणे’वरील गेट दुरुस्त होण्याची प्रतीक्षा! दुरुस्तीकाम लांबणीवर पडल्याने गोंधळ; धरणात पाणीसाठा कमीच

Goa Coconut: नारळांसाठी गोवा परराज्यांवर अवलंबून! हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वाढीमुळे वापर वाढला; कृषिमंत्री नाईकांनी दिली माहिती

Goa Live News: नोंदणीकृत मालवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडाला धडकला

Siddharth Jadhav: 'गोव्यात येणे, गोवेकरांशी संवाद साधणे आनंददायी'! सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या भावना; नव्या सिनेमाची दिली माहिती

Bicholim: कॉलेज आवारात विद्यार्थ्याला बेदम मारहाण! निवडणुक वादावरून गोंधळाची चर्चा; भाडोत्री युवकाला अटक

SCROLL FOR NEXT