Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

बार्देशात 6 उमेदवार बिनविरोध; पाच अवैध

तालुक्यातून एकूण 1142 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ग्राह्य

दैनिक गोमन्तक

म्हापसा : पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बार्देश तालुक्यातून सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. तर छाननीवेळी एकूण ११४२ नामांकन वैध धरण्यात आले. बुधवारी (ता. २७) अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, त्यानंतरच बार्देशातील उमेदवारांचा नेमका आकडा स्पष्ट होईल.

मंगळवारी नामांकन छाननीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी एकूण पाच नामांकन नाकारले. यामध्ये कांदोळी पंचायत प्रभाग 7 मधून मारिया ज्योकिम परेरा, साल्वादोर-दी-मुंद प्रभाग 2 मधून रोशनी सावईकर, शिवोली-सडये प्रभाग 1 मधून लाविनो फर्नांडिस, हणजूण-कायसूव प्रभाग 2 मधून पार्वती नागवेकर व हडफडे-नागवा प्रभाग 2 मधून ज्युआस फर्नांडिस यांचे नामांकन अवैध धरले.

तर नादोडा पंचायतीमधून तिघे, तर साल्वादोर-दी-मुंदमधून दोघे व रेईश मागूशमधून एकाची बिनविरोध निवड निश्चित झाली. बार्देशात 33 पंचायतीं असून एकूण 279 प्रभाग आहेत. नादोडा पंचायतच्या प्रभाग 4 मधून माजी सरंपच मधुरा मांद्रेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर, याच पंचायतच्या प्रभाग 3 मधून परेश गावस व प्रभाग 5 मधून रामा नादोडकर यांचीही बिनविरोध निवड झाली. तर रेईश-मागूश पंचायतच्या प्रभाग 4 मधून संगीता भोसले यांची बिनविरोध निवड झाली.

साल्वादोर-दी-मुंद पंचायतीच्या प्रभाग ३ मधून रीना फर्नांडिस तर प्रभाग २ मधून संदीप साळगावकर यांची बिनविरोध निवड झाली. संदीप साळगावकर हे माजी सरपंच तर रिना फर्नांडिस या माजी उपसरपंच होत्या. या दोघांना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचा पाठिंबा लाभला.

छाननीदरम्यान दोन ठिकाणी असे घडले नाट्य...

1 हणजूण पंचायतीच्या प्रभाग 7 मधील पेड्रो मेंडोन्का व रवी हरमलकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आले. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणी घेत या दोघांची उमेदवारी स्वीकारली. रमेश नाईक यांनी हरकत घेतलेली.

2 कळंगुट पंचायतीच्या प्रभाग 7 मधील फ्रान्सिस रॉड्रिग्स व अ‍ॅडेलिना रॉड्रिग्स यांच्या उमेदवारीवर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला. मात्र, हा आक्षेप फेटाळत या दोघांची उमेदवारी स्वीकारली. जोसेफ सिक्वेरा यांनी ही हरकत घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोव्‍यात काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने युवतींची फसवणूक! महाराष्‍ट्रातील मुलीही विळख्‍यात; नेपाळ, केनिया, युगांडाच्‍या तरुणींना आमिष

Panaji: पणजीला जुगार, ड्रग्ज, वेश्याव्यवसायाचा विळखा! LOP युरींनी वाचला सरकारच्या अपयशाचा पाढा

Goa Theft: रात्री दुकान फोडून घुसले चोरटे, हाती लागली फक्त चिल्लर, कोल्ड्रिंक पिऊन पळाले; पेडण्यात चोरांची झाली फजिती

Goa Tourism: 350 कोटींचे नवे प्रकल्‍प, पर्यटक वाढ; रशियातून विमान; पर्यटनमंत्री खंवटेंनी मांडला लेखाजोखा

Rashi Bhavishya 30 July 2025: प्रवासाची शक्यता,आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या; फसवणुकीपासून सावध राहा

SCROLL FOR NEXT