Panaji Traffic | Merces | AI Traffic Management System | ITMS
Panaji Traffic | Merces | AI Traffic Management System | ITMS  Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Violations: पणजीत 6 दिवसांत 1700 वाहनधारकांनी मोडले नियम; सरकारी वाहनांचाही समावेश

गोमंतक ऑनलाईन टीम

Intellegent Traffic Management System: गोव्याची राजधानी पणजी आणि परिसरात 1 जून पासून वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. एक जूनपासून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोबाईल क्रमांकावर चलन पाठवले जात आहे.

दरम्यान, गेल्या सहा दिवसांमध्ये एकूण 1700 जणांना नियमभंगाबद्दल ई-चलन पाठवले गेले आहे.

विशेष म्हणजे, या नियमभंग प्रकारांमध्ये सरकारी वाहनांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या वाहनांचे चलन सरकारच्या नावे पाठविण्यात आले आहे. तथापि, याचा दंड मात्र संबंधित वाहनचालकाकडून वसुल करण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीमध्ये या वाहनधकांचा गुन्हा कैद झाला आहे. यातील बहुतांश जण विनाहेलमेट दुचाकी चालवत होते, तसेच कारमध्ये अनेकांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता.

या वाहनधारकांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा पोस्टाद्वारे नियम उल्लंघनाचे पुरावे पाठवले गेले आहेत.

गेल्या काही दिवसांत ही पद्धत सुरू करूनही वाहनधारकांकडून नियम उल्लंघनाचे प्रकार सुरूच आहेत.

दरम्यान, पणजी, मेरशी, पर्वरी येथे आर्टिफिशियल इंटलिजेन्स (एआय) संचलित कॅमेरे लावण्यात आले आहे. तर अल्तिनो येथे आयटीएमएस चा नियंत्रण कक्ष आहे. एखाद्या वाहनाने नियम मोडला तर त्या वाहनाचा क्रमांक स्वयंचलितपणे या कॅमेऱ्यांद्वारे नोंद केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मुष्टिफंड शाळेला कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT