Panaji Smart City Work  Gomantak Digital Team
गोवा

Panaji Smart City Work : स्‍मार्ट सिटी मार्चची डेडलाईन उलटली, आता जूनचा वायदा

पहिल्या टप्प्यातील कामे : उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City Work : राजधानीत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) हाती घेतलेली पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा आयपीएससीडीएलच्या सीईओ मामू हागे यांनी कामांच्या पाहणीअंती सांगितले.

शुक्रवारी सकाळी मामू हागे यांनी महापालिकेच्या आणि आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली. या कामाबाबत आपण समाधानी आहात काय, यावर बोलण्याचे टाळत त्या म्हणाल्या, अनेक ठिकाणी समस्या आहेत, हे दिसून येत आहे.

पोर्तुगीजकालीन गटार व्यवस्था काही ठिकाणी बुजली गेली असून त्या ठिकाणी समांतर वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. दररोज आपण या कामाचा फिरून आढावा घेत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

पणजीतील ८.३०० कि. मी. रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यातील सुरवातीचे म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणच्या म्हणजेच ३०० मीटर रस्त्याचे आणि गटार व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. दररोज आपण या कामाचा पाहणी करून आढावा घेत आहे.

जमिनीखालून वाहिनी किंवा गटार व्यवस्था निर्माण करताना वेगवेगळ्या वाहिन्यांचा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक काम करताना येणाऱ्या अडचणी वेगळ्याच येत आहेत.

पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. यावेळी नागरिकांनाही त्याला तोंड द्यावे लागणार काय? यावर त्या म्हणाल्या, ते पाहावे लागणार आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते आहे, ते काम हाती घेण्यात आले आहे. कामाच्या दर्जाबाबत त्या म्हणाल्या, ते काम पाहून त्याचा दर्जा ठरविता येणार नाही, परंतु तो प्रत्यक्षात उपयोगात आल्यानंतर दिसून येईल.

आम्हाला ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण होईल असे वाटले होते, परंतु ज्या पद्धतीने वेगवेगळ्या समस्या निर्माण होत गेल्या, तसा कामाला विलंब झाला आहे. वास्तविक ज्या समस्या असतात, त्या लोकांना माहीत नसतात. जे लोक काम करतात, त्यांना त्यांची जाण असते. त्यामुळे प्रत्यक्षात जाऊन त्याची पाहणी करणे गरजेचे असते.

‘मलनिस्सारण वाहिन्यांचे काम पूर्णत्वाकडे’

मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे एक मोठे काम पूर्ण होत आहे. सांतिनेज येथे त्यासाठी भूमिगत वाहिनी टाकताना वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत. हे कामही या स्मार्ट सिटीचा एक मोठा भाग आहे, असे सांगत मामू हागे म्हणाल्या, शहरातील कोणी व्यावसायिक, नागरिक आपल्याकडे प्रत्यक्षात कामांबाबत तक्रारी घेऊन आले नाहीत. महापौर आणि आयुक्त या कामांबाबत भेटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Case: ‘त्या’ बांगलादेशी टोळीच्या पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी; कारागृहात रवानगी: रेकी करून टाकत होते दरोडा

Crime News: नोकरी गेली, नशेत गुरफटला, 24 तासात 3 हत्या केल्या! अखेर सैनिकाचा पोलिसांनी केला खात्मा; सीरियल किलरचा थरारक शेवट

Goa Medical Negligence: उपचारातील निष्काळजीपणामुळे11 वर्षीय मुलाने गमावला पाय! आरोग्य खात्याकडून डॉक्टरांचे तत्काळ निलंबन

Restricted Water Supply: तिसवाडी आणि फोंड्याला पाणीटंचाईचा फटका! 13 आणि 14 मे रोजी 'या' कारणामुळे पाणी पुरवठा मर्यादित

Ladakh Student Death Goa: लडाखमधील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; ओकांब नदीत बुडून मृत्यू: खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

SCROLL FOR NEXT