Panaji Smart City Work Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: पावसाळ्यानंतरच उलगडणार रस्त्यांचा दर्जा! पणजीत अजूनही उर्वरित 'स्मार्ट' कामं सुरूच

Panaji Smart City Work: इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडला (आयपीएससीडीएल) पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांपैकी रस्त्याची कामे न्यायालयात दिलेल्या तारखेच्या हमीनुसार पूर्ण झाली असे सांगता येऊ शकते.

Sameer Amunekar

पणजी: इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडला (आयपीएससीडीएल) पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांपैकी रस्त्याची कामे न्यायालयात दिलेल्या तारखेच्या हमीनुसार पूर्ण झाली असे सांगता येऊ शकते, परंतु केलेल्या डांबरीकरणाच्या, पदपथांच्या कामांचा दर्जा पावसाळ्यानंतरच स्पष्ट होईल. उर्वरित प्रकल्पांपैकी रायबंदर येथील मार्केट इमारत, जेटी आणि ताडमाड येथील पदपथाचे काम अद्याप सुरू आहे.

आयपीएससीडीएलने उच्च न्यायालयात ३१ मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे जाहीर केले होते. त्यानुसार सर्व रस्त्यांचे डांबरीकरण उरकले आहे. आत्माराम बोरकर आणि १८ जून रस्त्याचे काम वगळल्याने आयपीएससीडीएलने मानेवर बसू शकणारे हे कामाचे भूत झटकून लावले आहे.

दोन्ही रस्त्यांची कामे पोर्तुगीजकालीन गटारांमुळे करता येत नाहीत, असे कारण असले तरी पुढील ५० वर्षांचा विचार केला, तर सध्याची गटारे आणि करण्यात आलेली व्यवस्था या पावसाळ्यात पुराची स्थिती पार करणार आहेत का, हे दिसणार आहे. शहराबाहेर टाकले जाणारे पाणी मांडवी नदीच्या तोंडावर व्हॉल्व (दरवाजे) बसवून भरतीचे पाणी शहरात येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु ती किती यशस्वी होते हे पावसाळ्यातच उघड होणार आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात ओहोटी असल्यामुळे पाणी साचण्याचा प्रकार घडला नाही, परंतु आता पावसाळा सुरू होत असल्याने पावसातही केलेले डांबरीकरण आणि हाथरलेला हॉटमिक्सचा थर किती तग धरणार आहे हे कळून येणार आहे.

कारण आत्माराम बोरकर मार्गावर जुन्या नोवा गोवा हॉटेल म्हणजे सध्याच्या टीजीएसबी बँकेच्यासमोर हॉटमिक्स डांबरीकरणाचा पॅच मारला आहे. त्या डांबरीकरणाच्या पॅचखालून पावसाचे पाणी झिरपून वाहताना दिसत आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा दर्जा काय असणार आहे याचा अंदाज बांधता येतो.

रायबंदर मार्केट इमारतीचे काम

रायबंदर मार्केट कॉम्प्लेक्स हा स्मार्ट पणजीचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. जो आयपीएससीडीएलद्वारे विकसित केला जात आहे. या प्रकल्पात एक कम्युनिटी मार्केट आणि एक फिशिंग जेटी समाविष्ट आहे. सुरुवातीला ७.७३ कोटी रुपये खर्चाच्या या मार्केटच्या बांधकामाला आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये मंजूर आराखड्याविषयी व उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणासोबत (एनजीपीडीए) हा वादाचा समावेश आहे. अजूनही अपूर्णावस्थेत दोन्ही प्रकल्प आहेत.

पदपथाचे काम अद्याप सुरू

जूननंतर पदपथांची आणि इतर झाडे लावण्याची कामे केली जातील, असे आयपीएसडीएलने यापूर्वीच पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यानुसार पदपथांची उर्वरित कामांपैकी ताडमाड येथील अग्निशमन दलाच्या मैदानापासून ते थॉमस गॅरेजपर्यंतच्या पदपथांचे काम अद्याप सुरू आहे.

याशिवाय सांतिनेजमधील मधुबन सर्कल ते बालभवनपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नव्याने तयार केलेल्या पदपथाचे काम काही ठिकाणी उरकण्यात आले आहे. त्याशिवाय सरकारी छपाई कारखान्याजवळ नव्याने तयार केलेला पदपथ वाहिनीसाठी खोदला आहे. विशेष बाब म्हणजे पदपथांची कामे झाल्यानंतर खोदकाम केले जात असल्याचे चित्र यापूर्वीही दिसून आले आहे.

पाटो उद्यान कधी होणार खुले?

पाटो येथे लहान मुलांसाठी व ज्येष्ठांसाठी उभारलेल्या उद्यानाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे, परंतु अद्याप याठिकाणी जैवविविध रोपांची लागवड करण्यात आलेली नाही. हे उद्यान मळा-फोंतेईन्हास भागातील लोकांसाठी खास आकर्षण ठरणारी आहे. त्यामुळे हे उद्यान आता कधी खुले होणार आहे, याकडे निश्चित नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

बसस्थानकांचे काम अर्धवट

आयपीएससीडीएलने स्मार्ट सिटी मिशन ईव्ही बस सर्व्हिसेस उपक्रमांतर्गत उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १६१ बस थांबे अधिसूचित केले. कदंब ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (केटीसीएल) व्यवस्थापकीय संचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (साबांखा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित केलेले काम मार्गी लावणे हे होते, परंतु पणजी शहर ते दोनापावला परिसरापर्यंत उभारलेल्या बसस्थानकांविषयी स्थानिक आमदारांनी घेतलेल्या आक्षेपामुळे स्मार्ट बसस्थानकाचे काम अर्धवट स्थितीत राहिले आहे.

ईव्ही बसेस शहरातून धावू लागल्या असल्या तरी बस थांबे अजूनही अर्धवट स्थितीत आहेत. आमदारांच्या आक्षेपामुळे बसस्थानकाचे काम दोनवेळा करण्यात आले, पण ते काही पुढे जाऊ शकले नाही. ही बसस्थानके म्हणजे दुचाकी उभी करण्यासाठी किंवा दिखावा म्हणून उभारली असावीत असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT