LPG Gas Cylinder Dainik Gomantak
गोवा

Panaji: स्मार्ट रस्ते केले, गॅसवाहिनी नाही टाकली! पणजीतला सावळागोंधळ; हॉटेलमालकांची सिलिंडरसाठी धावपळ

Panaji Gas Problem: स्मार्ट रस्ते करताना त्याच्या खालून नॅचरल गॅसची वाहिनी टाकण्यात आली नाही, त्याचा फटका अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजधानी पणजी अर्धी स्मार्ट सिटी झाली, रस्तेही स्मार्ट झाले. मात्र, स्मार्ट रस्ते करताना त्याच्या खालून नॅचरल गॅसची वाहिनी टाकण्यात आली नाही, त्याचा फटका अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. नॅचरल गॅसची वाहिनीच टाकली न गेल्याने त्यांची जोडणी मिळाली नाही, पर्यायी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी हॉटेलचालकांना धावपळ करावी लागत आहे.

पणजीतील मध्यवर्ती भागात गोवा नॅचरल गॅस प्रा. लि. कंपनीतर्फे गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार गार्सिया गार्डनजवळ एमजी रोड ते चर्च स्क्वेअकरकडे जाणाऱ्या आरएस मार्गाचा स्मार्ट सिटीअंतर्गत कायापालट झाला, पण त्याठिकाणी मुख्य गॅसपाईपलाईन न टाकल्याने तातो हॉटेलला गॅस जोडणी मिळाली नाही.

संबंधित हॉटेल मालकाकडून अर्जही भरून नेण्यात आला होता, पण वाहिनीच न मिळाल्याने त्यांना आता टंचाईच्या काळात नियमित सिलिंडर मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तातो हॉटेलप्रमाणे पणजीतील इतर काही हॉटेल व्यावसायिकांचीही हेच गाऱ्हाणे आहे.

ज्या ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते करण्यात आले आहेत, त्याठिकाणी गॅसची वाहिनी टाकण्यात आली असती तर त्यानुसार जोडण्या घेणे सोयिस्कर झाले असते, परंतु आता स्मार्ट सिटीचे अंतर्गत करण्यात आलेले रस्ते खोदून पुन्हा गॅसवाहिनी टाकण्याचे काम करण्याला परवानगी मिळणे अवघड आहे. त्याशिवाय पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही रस्ते खोदण्यास विरोध दर्शविला आहे. नव्याने बांधलेले रस्ते व पदपथ खोदकाम केल्यास रस्त्याचा मजबुतपणा कमी होईल, तसेच पाण्याच्या निचरा व्यवस्थेवर परिणाम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

Sonam Wangchuk Hunger Strike: "मी भूत बनून परत येईन...", सोनम वांगचुक यांचा थेट इशारा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Sohail Khan: 'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, पण भीतीमुळे कुणालाही सांगितलं नाही'; सोहेल खानचा धक्कादायक खुलासा

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

SCROLL FOR NEXT