Panaji Smart City  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City : ‘स्मार्ट’ कामांचा दर्जा आधीच सिद्ध : संजीत रॉड्रिग्स

Panaji Smart City : मळ्यामध्ये असणारे ३,३०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City : पणजी, मंत्री बाबुश मोन्सेरात हे स्मार्ट सिटीच्या दर्जाबाबत वचनबद्धता देण्यास घाबरले असले तरी सीईओ संजीत रॉड्रिग्स पूर्ण झालेल्या कामासह एक वर्षाची गुणवत्ता आश्वासन आधीच मिळाल्याचा दावा करीत आहेत.

एक पावसाळा पार केल्याने हे काम कसोटीवर उतरले आहे. त्यासाठी बालभवनसमोरील रस्त्याचे उदाहरण ते देतात.

पत्रकार परिषदेत त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची विस्तृत माहिती दिली. कामे पूर्ण करण्याची ३१ मेची अंतिम मुदत पूर्ण करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ३१ मे ही सरकारची विस्तृत मुदत आहे. बालभवन समोरील अग्निशामक दलाच्या मुख्यालयापर्यंत झालेला रस्ता व्यवस्थित आहे आणि त्याठिकाणी निर्माण केलेल्या सुविधाही व्यवस्थित आहेत.

मिरामार येथील इंटरनॅशनल हॉटेल ते टोंका येथील मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रोडचेही काम झालेले आहे आणि काही थोडी कामे उरली आहेत, ती पूर्ण होतील. काकुलो मॉल ते मधुबन सोसायटीकडील रस्त्याचे कामाला काही अडथळे आले होते, अनेकांनी अतिक्रमण केले होते. त्यांना अतिक्रमण काढायला लावले.

पदपथ निर्माण करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा होता, तो आता हटविण्यात येत आहे. शीतल हॉटेल ते मधुबन सोसायटी या मार्गाचे काम करताना काही अडथळे आले आहेत, पण ते दूर केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्यावतीने स्मार्ट सिटी मिशन २०१५ ला सुरू झाले. २०१८ मध्ये ३५ प्रकल्पांचा प्रस्ताव देण्यात आला. ३ कामांचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आल्या. २०२१-२२ च्या मध्याला ३३ कामांचे आदेश निघाले आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनानुसार (एससीएम) विविध खात्यांकडे ते काम देण्यात आले. २०२२-२३ च्या मध्याला मुख्य रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाल्याचे संजित यांनी सांगितले.

अशी होत आहेत कामे !

शहरात ६०८० मीटर स्मार्ट रस्त्याचे काम होणार आहे. त्यात ५८० मीटर रस्त्याचे काम झालेले आहे. ५०० काम होत आहे आणि ७ हजार मीटर कामांचे नियोजन आहे. मध्य पणजीमध्ये मलनिस्सारणाच्या वाहिनी टाकण्याचे एकूण काम ८,५८० मीटर आहे.

त्यापैकी ७,९७२ मीटर काम पूर्ण झाले आहे. ६०८ मीटर काम बाकी आहे, म्हणजेच ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे आणि ७ टक्के काम शिल्लक आहे. फोन्ताइन्हेसमध्ये २,२८५ मीटरपैकी २,०८५ मीटर काम पूर्ण झाले आहे. १५० मीटर बाकी आहे.

मळ्यामध्ये असणारे ३,३०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. मिरामार-टोंका-करंजाळे या परिसरात एकूण २८०० मीटर कामांपैकी २१५० मीटर काम झाले आहे, तर ६५० मीटर म्हणजेच २३ टक्के काम बाकी आहे. सांतिनेज भागात २,९८५ मीटरपैकी २६१५ मीटर काम बाकी आहे, ३७० मीटरचे काम राहिले आहे.

काकुलो मॉल ते मलनिस्सारण प्रकल्पापर्यंतचे काम करण्यासाठी किमान आठ ते दहा मीटर जमिनीखालून वाहिनी टाकावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT