Panjim City  Dainik Gomantak
गोवा

पणजी ‘स्मार्ट सिटी’ दुर्गंधीच्या विळख्यात

सांडपाणी रस्त्यावर : नागरिकांना दुर्गंधी असह्य

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी शहराच्या कार्पोरेट कार्यालयाचा परिसर म्हणून ओळखला जाणारा पाटोचा अर्धा भाग सध्या पावसाच्या पाण्याखाली जात असल्याचे दिसते. त्यातच या परिसरातील सांडपाण्याचे चेंबर भरून वाहत असल्याने ते घाण पाणी पावसाच्या पाण्यात मिसळले आहे. गेल्या आठवडाभरापासून या परिसरातील चेंबरमधील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरातील कार्पोरेट कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना येता-जाता दुर्गंधी सहन करावी लागत आहे.

(Panaji ‘smart city’ in the grip of stench)

गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या अगदी समोरील बाजूस वाहन पार्किंगची मोठी जागा आहे. त्या गोलाकार वाहतूक बेटाजवळील सांडपाण्याच्या चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर येत आहे. या परिसराची देखभार महापालिकेकडे आहे, पण या परिसराचा नगरसेवक किंवा अभियंताही या ठिकाणी फिरकलेला नाही. मागील काही दिवसांपूर्वी अभियंता महापौरांना घेऊन फोन्तेइन्हासकडील पुलाकडे गेले होते, परंतु तोपर्यंत त्या मध्यवर्ती चौकातील पाण्याची पातळी कमी झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून या चौकात पाणी साचून राहत आहे. विशेषतः त्याशिवाय गेराच्या इमारतीसमोरही पाणी साचून राहत असल्याने दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे.

गेरा इमारतीच्या समोर पाणी साचल्यानंतर ते त्या इमारतीच्या वाहन पार्किंग तळावरही पाणी जाते. या परिसरात सध्या आणखी काही इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी जिरण्यासाठी लागणारी मोकळी जागा कमी होणार असून ते पाणी रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी साचण्याची शक्यता ओळखून त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करून पंपाद्वारे रुअ दी ओरेम खाडीत ते सोडण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. मळ्यातील पाण्यासाठी ज्या पद्धतीने पंप हाऊस उभारला तसा पंप हाऊस कला संस्कृती खात्याच्या जवळ उभारावा लागू शकतो, असेही नगरसेवक उदय मडकईकर म्हणाले.

गतवर्षी झाली होती दुरुस्ती

गतवर्षी गोलाकार वाहतूक बेटाजवळील त्या सांडपाण्याच्या चेंबरची दुरुस्ती करण्यात आली होती, त्यावेळी ते काम बरेच दिवस सुरू होते. अवंती हॉटेलजवळून सांडपाणी उपसा केला जातो ते पाणी सांतिनेज येथील प्रक्रिया प्रकल्पात नेले जाते, परंतु पावसामुळे सर्व वाहिन्या भरल्या जात असाव्यात. त्यामुळे चेंबर भरून वाहत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, पाटो परिसरातील गटाराचे पाणी वाहून जाण्यासाठी असणारी वाहिनी रुअ दी ओरेम खाडीजवळ बुजली गेली असावी. त्यामुळे पाणी तुंबले असावे असा अंदाज माजी महापौर तथा नगरसेवक शुभम चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.

"गेरा कंपनीने पाटो परिसरात दोन इमारती उभारताना पाण्याचे आऊटलेट काढले होते का हे महापालिकेने तपासायला हवे होते. कला व संस्कृती खात्याच्या शेजारी उत्तरेला ज्या दोन मोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत, त्या इमारती बांधण्यापूर्वी या परिसरात पाणी साचत नव्हते, परंतु त्या इमारती उभारल्या गेल्यानंतर पाणी साचण्याचे प्रकार सुरू झाले आहेत."

- उदय मडकईकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT