Panaji Road Updates Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीत 'बेवारस' वाहनांचा प्रश्न ऐरणीवर! खाण खात्याचे वाहन 'स्मार्ट' धुळीत!

Panaji Road Updates: पणजी शहर स्मार्ट बनविण्याचे इंद्रधनुष्य ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) पेलले आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू आहे.

Sameer Panditrao

पणजी: पणजी शहर स्मार्ट बनविण्याचे इंद्रधनुष्य ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) पेलले आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू आहे. या कामांमुळे खोदकाम झालेल्या डबऱ्यात खनिज खात्याचे अनेक वर्षांपासून बंद पडलेले वाहन अडकून पडले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून भोसले कॅफेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खाण खात्याचे वाहन पार्किंगच्या जागेत उभे करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून हे वाहन येथेच पडून आहे. याशिवाय पणजीत अनेक ठिकाणी रस्त्यालगत वाहने पडून आहेत. पाटो येथे नगर विकास प्राधिकरणाची कार अनेक वर्षांपासून उभी आहे. त्याशिवाय एक खासगी कारही अनेक वर्षांपासून तिथे धूळखात पडून आहे. याशिवाय पाटोवरील खासगी बस थांब्यापासून कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन कार अशाच धूळ खात पडलेल्या आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे स्मार्ट सिटीचे काम सुरू असतानाही खनिज खात्याचे वाहन हटविण्याचे किंवा तेथून दुसरीकडे नेण्याची हिंमत ‘इमॅजिन पणजी’ला झालेली नाही. आता खनिज खाते आपले वाहन कधी काढून नेणार, हे पहावे लागणार आहे. अशाच प्रकारे इतर ठिकाणीही धूळ खात वाहने पडलेली आहेत, त्याविरोधात कोणते खाते मोहीम उघडणार हे लवकरच दिसून येईल.

सांतिनेजमध्ये सांडपाण्याने भरला खड्डा

सांतिनेजमध्ये स्मार्ट रस्ते केले असले तरी केबल जोडणीची कामे बाकी आहेत. काही ठिकाणे खड्डे उघडे ठेवले आहेत.‘हमारा स्कूल’समोरच एका खड्ड्यात सांडपाणी जाऊन तो खड्डा भरला आहे आणि त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. याविषयी मनपाला स्थानिकांनी कळविले, शिवाय एकाने महापौरांनाही कल्पना दिली. त्यांनी सोमवारी पाहणीचे आश्‍वासन दिले. पण ते काही फिरकलेच नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT