Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: स्मार्ट पणजी शहरात ‘स्मार्ट’ खड्‌डे; विकास कामावरील कोट्यवधींचा निधी वाया

लोकप्रतिनिधींबाबत नागरिक नाराज; पालिकेचे दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City : राज्यभरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल जनतेतून संताप व चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते करून कोट्यवधींचा निधी वाया घालवून आपली फसवणूक केली जात असल्याची नागरिकांची भावना आहे. पैसा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी लोक सरकारी विभाग, पंचायत आणि नगरपालिका यांसारख्या स्थानिक प्रशासकीय संस्थांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याची गरज व्यक्त करतात. पालिका, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणापबद्द्ल नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आठवडाभरापूर्वी मान्सूनचे गोव्यात आगमन झाले आणि गोव्याची राजधानी जलमय झाली. मळा आणि इतर सखल भागात राहणाऱ्या लोकांना तेथे पाणी साचल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पणजीसह राज्यातील इतर भागांतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. याविषयी लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, वास्कोचे व्यापारी विष्णू केरकर म्हणाले, पावसाळ्यात संपूर्ण गोव्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय असते आणि बहुतांश भागात पाणी साचलेले असते.

स्थानिक पंचायत आणि नगरपालिकेचे मॉन्सूनपूर्व कामे योग्य पद्धतीने करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने असे घडते. रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम आज लोकांना भेडसावत आहे. रस्त्यांचे खड्डे पडणे, रस्त्याचे डांबरीकरण वाहून जाणे असे प्रकार पुढेही घडतील. मला असे वाटते की योग्य पायाभूत सुविधा नसणे म्हणजे सर्वसामान्यांवर अन्याय आहे.

रिटायर्ड कमांडर नारायणन म्हणाले, गोवा राज्यात अतिवृष्टी असते. यामुळे मॉन्सूनपूर्व कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याची सोय करण्यासाठी नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी वेळेत होणे आवश्यक आहे. पणजीमध्ये बहुतांश भागात पाणी साचण्याची समस्या आहे.

मॉन्सूनपूर्व कामांत दिरंगाई

नौदलाच्या शाळेतील शिक्षक साईश संझगिरी म्हणाले, गोव्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहणे खरोखरच दुःखदायक आहे. आपण ज्या नगरसेवकांना नगरपालिकेत पाठवतो, त्यांनी सर्वसामान्यांच्या वेदना समजून घेऊन समाजाच्या भल्यासाठी काम केले पाहिजे, असे मला वाटते. मॉन्सूनपूर्व कामे फेब्रुवारीपर्यंत सुरू केल्यास पाणी साचणे आणि नाले तुंबणे सहज टाळता येईल. त्यासाठी कामात दिरंगाई करू नये.

िवद्यार्थ्यांचा जीव मुठीत

विद्यार्थिंनी स्नेहल देसाई म्हणाली, जेव्हा कधी आम्ही कॉलेजला जातो, तेव्हा मोठा अडथळा जो येतो, तो म्हणजे खड्डेमय रस्त्यांचा. अशा खड्डेमय रस्त्यांमुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक त्रास होतात. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात व कित्येकदा विद्यार्थी याला बळी पडतात. सरकारी यंत्रणेने चांगल्या पद्धतीने काम करून लोकांच्या हितासाठी चांगले रस्ते आणि गरजेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

खराब रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळे रुग्णांना पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास होत असल्याची अनेक प्रकरणे त्यांनी पाहिली आहेत. पाणी तुंबणे आणि वाहनांचे अपघात टाळण्यासाठी योग्य डांबरी रस्ते आणि रस्त्याच्या कडेला स्वच्छ गटार असणे आवश्यक आहे.

डॉ. व्यंकटेश हेगडे, मडगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT