Panaji smart city boardwalk Dainik Gomantak
गोवा

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Panaji smart city boardwalk: स्मार्ट सिटी अंतर्गत कला संचालनालयाच्या मागील बाजूस रुआ दी ओरेम खाडीतील खारफुटीचा वापर करून ‘बोर्डवॉक’ साकारण्यात आला.

Sameer Panditrao

पणजी: स्मार्ट सिटी अंतर्गत कला संचालनालयाच्या मागील बाजूस रुआ दी ओरेम खाडीतील खारफुटीचा वापर करून ‘बोर्डवॉक’ साकारण्यात आला. परंतु गेली दोन वर्षांपासून या ‘बोर्डवॉक’ची दयनीय अवस्था झाली आहे. आता या ‘बोर्डवॉक’च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिका हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण नेमके काम कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता मात्र नाही.

स्मार्ट सिटीच्या अमृत योजनेअंतर्गत सर्वात पहिला प्रकल्प म्हणून इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड या संस्थेने हाती घेतला होता. ‘बोर्डवॉक' या खारफुटीत निर्माण केलेल्या लाकडी पुलाला सुस्थितीत असताना दररोज हजारो लोक भेट देत असत. त्यात युवक-युवतींचा भरणा अधिक होता.

परंतु गेल्या काही महिन्यांपासून या ‘बोर्डवॉक’च्या फळ्या तुटल्या असल्याने तो धोकादायक झाला, त्यामुळे तेथे प्रवेश बंदी केली आहे. तरीही अनेक जोडपी या धोक्याकडे दुर्लक्ष करून येथे निवांतपणा शोधायला येतात. या धोकादायक बोर्डवॉकविषयी सतत ‘गोमन्तक'ने सचित्र वृत्तांत प्रसिद्धही केला होता.

दोन वर्षांनी महानगरपालिकेने या ‘बोर्डवॉक’ची दुरुस्त करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी अंदाजपत्रक तयार केले जात असून, येत्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.‘बोर्डवॉक’चे लाकडी काम खराब झाले आहे.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने २.५ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा ‘बोर्डवॉक’ २०१८ मध्ये खुला केला होता. दुर्लक्षामुळे शहराचे पर्यावरणीय आकर्षण पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत उद्ध्वस्त झाले आणि अखेर २०२३ मध्ये ते बंद पडले. तत्पूर्वी स्मार्ट सिटीने २०२२ मध्ये हा प्रकल्प महानगरपालिकेकडे सोपवून त्या जबाबदारीतून मुक्तता करवून घेतली होती. यापूर्वी या बोर्डवॉकची किरकोळ दुरुस्तीदेखील करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

Horoscope: घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव, वातावरण अत्यंत मंगलमय राहील; दिवाळीच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस?

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

SCROLL FOR NEXT