गोवा एक समृद्ध राज्य आहे. शिक्षण क्षेत्रातही प्रगत राज्य आहे, परंतु राज्यातील विद्यार्थी केंद्रीय यूपीएसी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
गोव्यातील यूपीएससी, सीए, एमडी, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकांतात अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. आजच्या शहरीकरणाच्या धकाधकीत घरांत एकांत जागा मिळत नसल्याने अनेकांसाठी कृष्णदास श्यामा वाचनालयातील संशोधन कक्ष महत्त्वाचे ठरत आहेत.
ग्रंथालयात २४ तासांत आपल्याला जसा वेळ मिळेल, तसे येऊन आपला अभ्यास करता येतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ज्या सुविधा हव्यात त्या येथे उपलब्ध आहेत. हे कक्ष मिळविण्यासाठी सहा-सहा महिने वेटींगलीस्टवर राहावे लागत असल्याचे वाचनालयाचे ग्रंथपाल डॉ. सुशांत तांडेल यांनी सांगितले.
या आहेत सुविधा
वाचनालयात एकूण ९ संशोधन कक्ष आहेत.पाणी तसेच इतर आवश्यक सुविधा, फॅन, एसीची सुविधा, २४ तासांत केव्हाही येऊन अभ्यास करू शकतात. यूपीएसी, पीएचडी, स्पर्धात्मक परीक्षा, सीए, एमडी परीक्षांच्या विद्यार्थ्यांद्वारे मागणी. किमान ३ महिने व कमाल १ वर्षासाठी हे कक्ष उपलब्ध.
मी यूपीएसी परीक्षेची तयारी करत असून माझ्यासाठी या कक्षांचा लाभ होत आहे. येथे माझ्या अभ्यासात कोणताच व्यत्यय येत नसल्याने मला तासंनतास अभ्यास करता येतो. येथे अभ्यास करत असल्याने माझ्या अभ्यासात देखील सुधारणा झाली आहे.
-अलिशा हळर्णकर, विद्यार्थिनी
या संशोधन कक्षांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. नावेली येथील जिल्हा वाचनालयात अशा स्वरूपाचे कक्ष सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच सांखळी, फोंडा आणि कुडचडे येथे होऊ घातलेल्या वाचनालयांतही असे कक्ष सुरू करण्यासाठी मागणी आहे. जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाच्या अभ्यासासाठी मदत होईल.
डॉ. सुशांत तांडेल, ग्रंथपाल, कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालय, पणजी.
या आहेत सुविधा
वाचनालयात एकूण ९ संसोधन कक्ष आहेत.पाणी तसेच इतर आवश्यक सुविधा, फॅन, एसीची सुविधा, २४ तासांत केव्हाही येऊन अभ्यास करू शकतात. यूपीएसी, पीएचडी, स्पर्धात्मक परीक्षा, सीए, एमडी परीक्षांच्या विद्यार्थ्यांद्वारे मागणी.किमान ३ महिने व कमाल १ वर्षासाठी हे कक्ष उपलब्ध.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.