Smart City Panaji 
गोवा

Smart City Panaji: पणजीत तीन तासांत 3.69 इंच पाऊस; अवकाळीच्या दणक्यात स्मार्ट सिटी बुडाली

Smart City Panaji:मराठवाड्यातून उत्तर कर्नाटककडे सरकणाऱ्या ट्रफ्समुळे हा अवकाळी पाऊस पडला, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City Panaji

राज्यात गेले कित्येक दिवस उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज सकाळपासून राजधानी पणजीसह राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले. राजधानी पणजी तर यंदाच्या हंगामातील पहिल्याच अवकाळी पावसाच्या दणक्याने जलमय झाली.

मागील तीन-चार दिवस राज्यात दमट वातावरण तयार झाले होते. आज सकाळीही वातावरण ढगाळ होते. मात्र, अचानक सकाळी 10.30 च्या सुमारास राज्यात दमदार पावसाला सुरवात झाली.

मराठवाड्यातून उत्तर कर्नाटककडे सरकणाऱ्या ट्रफ्समुळे हा अवकाळी पाऊस पडला, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

अकस्मात आलेल्या पावसाने सर्वांचाच गोंधळ उडाला. फोंडा आणि साखळीत पावसामुळे विजेचा लपंडाव पाहायला मिळाला. साखळीतील चैत्र

उत्सवानिमित्त आलेल्या दुकानदारांची अवकाळी पावसाने तारांबळ उडविली. राज्यात ठिकठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडून नुकसान झाले.

अनेक दुकानांत शिरले पाणी

अवकाळी पावसामुळे अवघ्या काही मिनिटांत स्मार्ट सिटी जलमय झाली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 18 जून रस्त्यावरील अनेक दुकानांत पाणी शिरले.

सलग तीन तास पडलेल्या पावसामुळे दयानंद बांदोडकर रस्ता, मिरामार परिसर, 18 जून रस्ता, भाटले, टोंक भागातील काही परिसर, कदंब बसस्थानक परिसर जलमय झाला. स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेला परिसर चिखलमय झाला. 'बॉम्बे बझार' परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

'मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटक परिसरात ट्रफ्स सरकत आल्याचे निदर्शनास आले होते. या ट्रफ्सच्या प्रभावामुळे आज राज्यात पावसाची पडला. राजधानी पणजीत सकाळी 8.30 ते 11.30 वा. दरम्यान 93.8 मि.मी. (3.69 इंच) पावसाची नोंद झाली,' अशी माहिती गोवा वेधशाळेच्या वैज्ञानिक डॉ. राजश्री यांनी दिली.

आज फक्त तीन तास पाऊस पडल्याने पणजीत जी स्थिती निर्माण झाली, तो फक्त एक ट्रेलर आहे. खरा सिनेमा दोन महिन्यांत दिसणार आहे. गटारे तुंबल्यामुळे जिथे जिथे पाणी साचले, त्या त्या भागाची पणजी महापालिकेने त्वरित पाहणी करून पाण्याच्या वाटा मोकळ्या करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, असे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

SCROLL FOR NEXT