Panaji police station attack case  Dainik Gomantak
गोवा

Panaji police station attack : बाबूश यांच्‍या समर्थकांना रोखण्‍यासाठी केला गोळीबार

नाईक यांची साक्ष : पुढील सुनावणी 9 जून रोजी

दैनिक गोमन्तक डिजिटल

2008 साली घडलेल्‍या आणि आता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्‍यामुळे पुन्‍हा एकदा चर्चेत आलेल्‍या बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांच्‍या समर्थकांकडून झालेल्‍या पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणातील सुनावणी आता रंगू लागली आहे. पणजीचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक आणि सध्‍याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांची साक्ष लक्षवेधक ठरत आहे.

खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर शुक्रवारी (ता.28) दिलेल्‍या साक्षीत नाईक यांनी शेकडो लोकांचा मोर्चा घेऊन बाबूश मोन्‍सेरात पणजी पोलिस स्‍थानकावर चाल करून आले होते.

हा जमाव प्रक्षोभक बनल्‍यावर नियंत्रणात येत नसल्‍याने शेवटी सहावेळा हवेत गोळीबार करण्‍यात आला, असे सांगितले. नाईक यांची सरतपासणी अजूनही चालू असून यापुढील सुनावणी 9 जून रोजी होणार आहे.

असे घडले प्रकरण

  • फेब्रुवारी 2008 मध्‍ये ताळगावचे तत्‍कालीन आमदार बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या काही कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक केल्‍यानंतर विरोधी गटातील संशयितांनाही अटक करा, अशी मागणी घेऊन हा जमाव पोलिस स्‍थानकावर आला होता.

  • पोलिसांच्‍या आरोपपत्राप्रमाणे त्‍यावेळी मोन्‍सेरात यांनी प्रक्षोभक भाषण केल्‍याने जमाव खवळला आणि त्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत कित्‍येक पोलिस जखमी झाले.

  • या प्रकरणात तपास करण्‍यास सीबीआयने बाबूश मोन्‍सेरात व त्‍यांच्‍या पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात यांच्‍यासह एकूण ३७ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT