Panaji Riverfront Dainik Gomantak
गोवा

Panaji Riverfront: पणजीसाठी नवे ‘रिव्हरफ्रंट’! मांडवी काठावर शहरातील निसर्गरम्य खुले स्थळ

Panaji New Riverfront: उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सोहळ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पणजी शहराला आता आणखी एक आकर्षण लाभले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सोहळ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पणजी शहराला आता आणखी एक आकर्षण लाभले आहे. मांडवी नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या ‘द रिव्हरफ्रंट’ या राज्याच्या राजधानीतील सर्वात मोठ्या खुल्या स्थळाचा अलीकडेच शुभारंभ झाला आहे.

तत्कालीन मांडवी हॉटेलजवळ, शहरातील एक महत्त्वाचे ओळखचिन्ह असलेल्या परिसरात वसलेले ‘रिव्हरफ्रंट’ मांडवी नदीच्या सुमारे ७०० फूट लांबीच्या काठावर पसरले आहे. विवाह समारंभ, सामाजिक सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, पॉप-अप उपक्रम, प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे स्थळ उपयुक्त ठरणार आहे.

बेंगळुरूस्थित एमआरजी समूहाने विकसित केलेले ‘रिव्हरफ्रंट’ गोव्यातील समूहाच्या वाढत्या आदरातिथ्य व रिअल इस्टेट क्षेत्रातील उपस्थितीचे प्रतीक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, स्वतंत्र सेवा क्षेत्रे आणि पार्किंग सुविधा असतानाही, या स्थळाची वास्तुरचना साधी व संयत ठेवण्यात आली असून कार्यक्रमांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी, यावर भर देण्यात आला आहे.

‘रिव्हरफ्रंट’चे उद्‍घाटन ‘आर्ट स्टोरीज’ या समावेशक कला प्रदर्शनाने करण्यात आले. या प्रदर्शनात कारितास गोवा अंतर्गत येणाऱ्या दिव्य सदन आणि सेंट फ्रान्सिस झेवियर व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील विशेष क्षमतांच्या मुले व प्रौढांनी सहभागी होऊन सहकार्याने कलाकृती साकारल्या.

लिओबा नेपल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समिरा शेट यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या कलाकृतींमध्ये बागकाम, भाजीपाला लागवड यांसारख्या दैनंदिन जीवनातील अनुभवांसह गोव्याचे महान कलाकार एफ. एन. सौझा, विन्सेंट व्हॅन गॉग आणि पॉल क्ले यांच्या कलेपासून प्रेरणा घेतलेली मांडणी दिसून आली.

या प्रदर्शनातून सामायिक अनुभवांवर आधारित शांत व चिंतनशील कथा उलगडण्यात आल्या.यावेळी बोलताना एमआरजी समूहाचे अध्यक्ष डॉ. के. प्रकाश शेट्टी म्हणाले, पणजीच्या स्थापत्य आणि सांस्कृतिक ओळखीशी सुसंगत, खुले आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध असे स्थळ उभारण्याचा आमचा उद्देश होता. मांडवी नदी ही या शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

Goan Ghost Stories: पर्वरीत पांढऱ्या वेषातील बाई दिसली, मांडवी पुलावर पोचेपर्यंत त्या भुताने माझा पाठलाग केला; भुतांचे अस्तित्व

Viral Video: जुगाड की वेडेपणा? एक कार अन् 50 प्रवासी! व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, 'हे भारतातच शक्य'!

Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT