Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : आपली मूळ वैभवसंपन्न संस्कृती कधीही विसरू नये : उत्पल पर्रीकर

Panaji News : आज आपल्या वेशभूषेवर, सांस्कृतिक कार्यक्रमांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव दिसतो तेव्हा आपली मूळ संस्कृती हरवू देता कामा नये. पानवेलकर मंडळ त्यादृष्टीने चांगले कार्य करत आहे,असेही ते म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, राज्याचा वा देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्यात कलेचा मोठा वाटा असतो,असे सामाजिक कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

आज आपल्या वेशभूषेवर, सांस्कृतिक कार्यक्रमांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव दिसतो तेव्हा आपली मूळ संस्कृती हरवू देता कामा नये. पानवेलकर मंडळ त्यादृष्टीने चांगले कार्य करत आहे,असेही ते म्हणाले.

पानवेल रायबंदर येथील पानवेलकर कला सांस्कृतिक मंडळाचा १८ वा वर्धापनदिन शनिवारी पानवेल येथील विठ्ठल देवस्थानच्या रंगमंचावर उत्साहात झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते उत्पल पर्रीकर व समील वळवईकर, सन्माननीय पाहुणे म्हणून पत्रकार तथा लेखक राजू भि. नाईक, विशेष पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलाकार नितीन कोरगावकर, खास निमंत्रित जुने गोवेचे पंच विनोद नाईक, विठ्ठल देवस्थानचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ भजनी कलाकार शिवदास नाईक,

विद्यमान अध्यक्ष जयकुमार आमोणकर, सचिव परेश तुळशीदास बांदोडकर, खजिनदार नीलेश गावकर, बलभीम महारुद्र देवस्थानचे अध्यक्ष उदय कवळेकर, दुलबा नाईक, जुने गोवेचे माजी सरपंच नीळकंठ भोमकर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष संदीप सत्यवान नाईक यांनी यावेळी नूतन अध्यक्ष संदेश बांदोडकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली.

मान्यवरांचा सत्कार

ज्येष्ठ छायापत्रकार उमेश बाणास्तरकर , कलाकार रोहिनीकांत ऊर्फ श्याम रामराव नाईक व कृष्णा ऊर्फ दादा दत्ता कांदोळर तसेच युवा शरीर सौष्ठवपटू नेहाल महेश सातर्डेकर, परेश सुरेश गोवेकर व युवा पत्रकार केतन राजेश गोलतकर यांचा यावेळी, शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह, मानपत्र देवून मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..ये ऐसेही किंग नही है'! विराट कोहलीचे सरावाला प्राधान्य; हजारे करंडकमध्ये दिल्लीसाठी खेळणार 3रा सामना

Konkani Films: कोकणी सिनेमा हा आमचा स्वतःचा सिनेमा, ही भावना गोव्यातील प्रेक्षकांमध्ये रुजू लागली आहे..

Goa Tourism: देशी-विदेशी पर्यटकांनी किनारे फुलले! बेकायदा पार्ट्यांची धूम, ‘सायलंट झोन’मध्येही गोंगाट; नियमांना हरताळ

Arambol: 'जमीन रूपांतरास आपला पूर्ण विरोध'! आमदार आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलवासीयांसोबत राहणार असल्याचा केला दावा

Rope Skipping Championship: राष्ट्रीय रोप स्किपिंगमध्ये गोव्याची उल्लेखनीय कामगिरी! पटकावली 24 पदके

SCROLL FOR NEXT