Agnelo Fernandes

 

Dainik Gomantak 

गोवा

पणजी महापालिका आयुक्त आग्नेल फेर्नांडिस यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप निश्चित

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा (Vincent DeSilva) यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या 13 (2) व 13 (ई) कलमाखाली आरोप निश्चित केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्याचे पणजी महापालिका (panaji municipal corporation) आयुक्त आणि पूर्वीचे सहाय्यक पासपोर्ट संचालक आग्नेल फेर्नांडिस (Agnelo Fernandes) यांच्यासह त्यांची पत्नी सिंथीया यांच्याविरोधात आज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा (Vincent DeSilva) यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या 13 (2) व 13 (ई) कलमाखाली आरोप निश्चित केले. दोन्ही संशयितांनी आपल्यावरील आरोप नाकारल्याने आता या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते.

ऑक्टोबर 2013 ते मार्च 2016 या दरम्यान पासपोर्ट कार्यालयात उप संचालक असताना फेर्नांडिस यांनी गैरमार्गाने पैसे कमविले असा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्या घरावर छापा टाकला असता ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती त्यांच्याकडे सापडली. ही मालमत्ता बेहिशोबी असल्याचा सीबीआयचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT