Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panaji: बाबूशनी एकदा दुचाकीवरून प्रवास करावाच! पणजीतील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया; रस्त्यांच्या अवस्थेने चालक त्रस्त

Babush Monserrate: एका रहिवासी सोसायटीतील एकाला ओबडधोबड बसविलेल्या पेव्हर्समुळे जो अपघात झाला होता, तो पाहता अजूनही त्या ठिकाणच्या पेव्हर्स बसविण्यात सुधारणा झालेली नाही.

Sameer Panditrao

पणजी: पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी फोन्तेन्हास येथील चर्चपासून ते भाटलेतील श्रीराम मंदिरापर्यंतच्‍या रस्‍त्‍यावर गर्दीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करावा, म्हणजे या मार्गावर किती त्रास सहन करावा लागतोय हे समजेल, अशा संतप्‍त प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

येथील एका रहिवासी सोसायटीतील एकाला ओबडधोबड बसविलेल्या पेव्हर्समुळे जो अपघात झाला होता, तो पाहता अजूनही त्या ठिकाणच्या पेव्हर्स बसविण्यात सुधारणा झालेली नाही. या ठिकाणी ताळगाव परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती, तेव्हा खोदकामानंतर पेव्हर्स बसविण्यात आले.

पण पुन्हा एकदा अवजड वाहनांमुळे पेव्हर्स खाली-वर झाले आहेत. शिवाय रस्ता अरुंद आहे, पण कदंब बसस्थानकाकडून येणारे वाहनचालक ताळगाव, मिरामार व आल्तिनो येथे जाण्यासाठीजवळचा मार्ग असल्याने याच मार्गाचा वापर करतात. गेल्या वर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. अजूनही तो तसाच आहे.

नेवगीनगर- पाटो पूल रस्ताही खडबडीत

चारचाकी वाहनचालक रस्ता आपल्या मालकीचाच असल्यासारखे भरधाव वाहने चालवत असतात. मळ्यातील फोर पिलर चौकापासून (नेवगीनगर) ते पाटो पुलापर्यंतचा रस्ता खडबडीत झालेला आहे, तेथे पाणी साचते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समूद्र खवळला! उंचच उंच लाटा, रस्त्यांवर कोसळली झाडे; तैवानमध्ये 'चांपी' वादळाचा कहर! 500 हून अधिक जखमी, 1.67 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित

Covid Rules Violation: कोविड नियमभंग प्रकरणात पोलिसांची विनंती फेटाळली; सुदिन ढवळीकरांविरोधातील आरोपपत्राचा विलंब माफ करण्यास न्यायालयाचा नकार

Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

Shreyas Iyer Record: श्रेयस अय्यरच्या निशाण्यावर रोहित शर्माचा मोठा विक्रम! न्यूझीलंडविरुद्ध 'इतक्या' धावा करताच रचणार इतिहास

Accident Death: गोव्यात कार-ट्रकची भीषण धडक; बंगळुरूतील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, मेहुणी बचावली

SCROLL FOR NEXT