Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : वटवृक्षाचे स्थलांतर; आत्ता ‘रेन ट्री’वर संकट

Panaji News : या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वृक्षप्रेमी होते, त्यामुळे संबंधित यंत्रणेने मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात वडाचे झाड जमिनीपासून मोकळे केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सांतिनेजमधील कामत प्लाझापासून काही अंतरावर असलेल्या २०० वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाचे स्थलांतर कांपाल येथील नव्या फुटबॉल मैदानावर करण्यात आले. तर या इमारतीला लागून असलेल्या ‘रेन ट्री‘ हे झाड रविवारी हटविण्यास सुरुवात झाली होती.

पोलिस बंदोबस्तात सकाळपासून रेन ट्रीच्या उर्वरित फांद्या हटवण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. आता या झाडाचेही स्थलांतर केले जाणार आहे. वेलनेस मेडिकल ते कामत प्लाझा या दरम्यान वडाचे आणि रेन ट्रीचे झाड आहे.

ही झाडे रस्त्याच्या कामाला अडथळा ठरत असल्याने ती हटवावी लागणार असल्याने नगर विकास प्राधिकरणाने वनखात्याकडून परवानगी घेतली. त्यानुसार ती झाडे हटविण्यास दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. परंतु वृक्षप्रेमींनी या झाडाच्या स्थलांतराला अटकाव केल्याने संबंधित यंत्रणेने ते काम बंद ठेवले.

या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वृक्षप्रेमी होते, त्यामुळे संबंधित यंत्रणेने मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात वडाचे झाड जमिनीपासून मोकळे केले. शनिवारी त्या झाडाचे मुळासह कापून काढलेले खोड कांपाल येथील नव्या फुटबॉल मैदानाच्या परिसरात नेण्यात आले. रविवारी सकाळी त्याचे पुनर्रोपण करण्यात आले.

रेन ट्रीचे झाड हटविण्यासाठी त्याच्या फांद्या कापण्याचे रविवारी काम सुरू होते. सायंकाळपर्यंत ते काम चालू होते. सोमवारी (उद्या) वृक्षप्रेमी उच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागणार आहेत. संबंधित यंत्रणेने शनिवार, रविवार ही सुटीचे वार पाहूनच झाडे हटविण्याचे काम हाती घेतल्याचे वृक्षप्रेमींचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT